सध्या झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका चांगलीच गाजतेय. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेतील कथेत प्रेक्षक एवढे गुंतून गेले आहेत की अनेकदा यात दाखवणारे सीन्स त्यांना खरे वाटतात. असाच अनुभव अभिनेत्री कीर्ती मेहेंदळेला आला. अखेर तिने एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना पडद्यामागची गोष्ट सांगितली.
अभिनेत्री कीर्ती मेहेंदळे या मालिकेत ‘वर्षा कर्णिक’ ही भूमिका साकारत आहे. सध्या या मालिकेत तिला नवऱ्याच्या त्रासाला समोर जावं लागत आहे. या तिचा नवरा तिला मारहाण करतो असंही दाखवण्यात आलं. ही मारहाण काही प्रेक्षकांना खरी वाटली आणि त्यांनी कीर्तीचे विचारपूस करायला सुरुवात केली. अखेर कीर्तीने या मालिकेत तिच्या नवऱ्याची भूमिका साकारत असलेला अभिनेता अनिरुद्धचे आभार मानत प्रेक्षकांचा गैरसमज दूर केला आहे.
आणखी वाचा : “आता पूर्णविराम देण्याची वेळ आलीये…” म्हणणाऱ्या सुव्रत जोशीचे पत्नी सखी गोखलेने मानले आभार, म्हणाली…
तिने तिचा आणि अनिरुद्धचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं, “गेले काही दिवस आपली सिरीयल बघून लोक मला विचारतायत की, “वर्षा ताई किती मार खल्लात हो तुम्ही, का सहन करता…” प्रेक्षकांची इतकी इन्व्हॉलमेंट बघून, आपल्यावरचं प्रेम बघून खूप छान वाटतं. पण मला हे आवर्जून सांगायचंय की हे सगळे मारामारीचे, ओढाताणीचे सीन शूट करत असताना आमच्या डायरेक्टरपासून स्पॉटबॉयपर्यंत आमच्या सगळ्या युनिटने माझी खूप काळजी घेतली.”
हेही वाचा : “अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत…” स्पृहा जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष
पुढे ती म्हणाली, “ज्याच्या बरोबर हे सीन मला प्रत्यक्ष करायचे होते त्या अनिरुद्धनेही मला खूप जपलं. मला ढकलतान, मारताना मला दुखापत होणार नाही यासाठी सीन करताना अनिरुद्ध कायम अलर्ट असायचा. थँक यू अनिरुद्ध, तू खूप कमाल सहकलाकर आहेस.” तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.