Ankita PrabhuWalawalkar & Kunal Bhagat Mehendi Ceremony : अंकिता वालावलकरच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडल्यावर अंकिताने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सर्वांसमोर रिव्हिल केला होता. जानेवारी महिन्यात लग्नपत्रिकेची लहानशी झलक शेअर करत अंकिताने, लवकरच ती आयुष्याची एक नवीन सुरुवात करणार असल्याचं आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं. आता अंकिता लग्नसोहळ्यासाठी आपल्या गावी पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंकिता व कुणाल यांचा लग्नसोहळा कोकणात देवबाग येथे पार पडणार आहे. यासाठी अंकिताच्या सासरचे लोक, जवळचे मित्रमंडळी आणि काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सुद्धा कोकणात पोहोचले आहेत. अंकितासह तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रेमाने स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. आता अंकिताला कुणालच्या नावाची मेहंदी लागली आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’च्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून, अंकिता व कुणालचा मेहंदीसोहळा नुकताच पार पडला आहे. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिताने यात नारिंगी रंगाचा ड्रेस व हातात सुंदर असा बटवा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर, कुणालने शेरवानी आणि त्यावर अंकिताच्या ड्रेसला मॅचिंग होईल अशी ओढणी घेतली आहे. दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.

मेहंदीचे फोटो शेअर करत अंकिताने याला सुंदर असं कॅप्शन दिलं आहे ती लिहिते, “तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू काही करू शकत नाहीस आयुष्यात असं बोलणाऱ्या गर्दी मध्ये जेव्हा कोणी हे म्हणतं… “तू जशी आहेस तशी फार सुंदर आहेस, तू प्रेमळ आहेस आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तू जशी आहेस तशीच कायम राहा कारण, मी तुझ्या असण्यावर प्रेम करतो” तेव्हा वाटलं आयुष्याला खरा अर्थ आहे. त्याच आयुष्याची पहिली पायरी सोबत चढतोय. आशीर्वाद असूद्या! Beginning of Forever…”

दरम्यान, अंकिताच्या या फोटोंवर नेटकऱ्यांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता ही जोडी येत्या २ दिवसांत लग्नगाठ बांधून एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.