Ankita Prabhu Walavalkar Pushpa 2 Review : अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा 2’ चित्रपट गुरुवारी (५ डिसेंबर रोजी) जगभरात प्रदर्शित झाला. दोन दिवसांत या चित्रपटाने ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने ‘पुष्पा 2’ बद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिताने अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट पाहिल्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. तिने कलाकारांचा अभिनय चांगला असल्याचं म्हटलं आहे. मात्र चित्रपटाची कथा चांगली नसल्याचं ती म्हणाली. तिने लोकांना ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी पैसे वाया न घालवण्याचा सल्ला दिला आहे. अंकिताने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – Pushpa 2 Movie Review : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा चित्रपट कसा आहे? सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…

अंकिता वालावलकर ‘पुष्पा 2’ बद्दल काय म्हणाली?

अंकिताने या सिनेमातील कलाकारांना १०० पैकी १०० गुण दिले आहेत. मात्र कथा चांगली नसल्याचं तिचं म्हणणं आहे. तीन वर्षांपूर्वी आलेला ‘पुष्पा’ चित्रपट ‘पुष्पा 2’ पेक्षा खूप चांगला होता, असं अंकिताने म्हटलंय. “यापेक्षा ‘पुष्पा’ चित्रपट खूप चांगला होता. प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका. मनोरंजन हे खूप प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे जे चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतात असे चित्रपट तयार करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे,” असं अंकिताने या सिनेमाचं पोस्टर शेअर करून लिहिलं.

अंकिता प्रभू वालावलकरची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

‘पुष्पा 2’चे कलेक्शन

‘पुष्पा 2’ ने पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारतात तब्बल १७५.१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर जगभरात २९४ कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतात ९० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. वीकेंड असल्याने शनिवार व रविवार या दोन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – “मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

‘पुष्पा 2’ मधील कलाकार

‘पुष्पा 2’ हा तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासह मल्याळम अभिनेता फहाद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती मैथ्री मूव्ही मेकर्सने केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kokan hearted girl ankita prabhu walavalkar says dont waste your money on pushpa 2 hrc