या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. तिने अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केलं होतं, १७ व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली. पण दुर्दैवाने तिचं लग्न फक्त २ वर्षे टिकलं आणि त्या मुलांची जबाबदारी कमी वयात तिच्यावर आली. या अभिनेत्रीने आलेल्या परिस्थितीत न खचता पुढे जायचं ठरवलं. टीव्ही मालिकांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली आणि तिच्या मुलांचा सांभाळही केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता एका मुलाखतीत तिने तिचा घटस्फोट, मुलांचा जन्म याबद्दल भाष्य केलं. तिच्या मुलांनी आपल्या वडिलांना पाहिलंच नाहीये, असा खुलासाही तिने केला. घटस्फोटाला जवळपास ३ दशकं उलटली असली तरी ही अभिनेत्री अजूनही सिंगल आहे, तिने दुसरं लग्न केलं नाही.

कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री म्हणजे छोट्या पडद्यावर खलनायिकेची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली उर्वशी ढोलकिया होय. अभिनेत्री उर्वशी ढोलकिया सध्या तिच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असलेल्या उर्वशीने तिची जुळी मुलं क्षितिज आणि सागरबद्दल तसेच तिच्या घटस्फोटाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने सांगितलं की तिने वयाच्या १७ व्या वर्षी लग्न केलं होतं. आणि दोन वर्षांनी ती फक्त १८ वर्षांची असताना तिचा घटस्फोट झाला.

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया घटस्फोटाबद्दल व्यक्त झाली. तसेच तिने सिंगल मदर म्हणून तिच्या जुळ्या मुलांचा कसा सांभाळ केला, त्याबद्दलही सांगितलं. उर्वशीने खुलासा केला की तिची जुळी मुलं क्षितीज आणि सागर यांनी कधीही त्यांच्या वडिलांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. “आम्ही त्याबद्दल बोललोय, पण ते म्हणाले की आता आम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं नाही. मी त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना त्याबद्दल जाणून घ्यायचंच नव्हतं,” असं उर्वशी म्हणाली.

उर्वशी तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल बोलताना म्हणाली, “तो कधीच आपल्या मुलांच्या संपर्कात नव्हता. मुलं दीड वर्षांची झाल्यापासून कधीच त्यांच्या वडिलांशी बोललेली नाहीत. मी १८ वर्षांची असताना माझ्या मुलांची आई आणि वडील दोन्ही झाले होते.”

घटस्फोटाचा कसा परिणाम झाला आणि या सगळ्यातून ती कशी बाहेर आली याबद्दल उर्वशीने सांगितलं. “एक काळ असा होता की घटस्फोटानंतर मी स्वत:ला महिनाभर एका खोलीत बंद केलं होतं, जेणेकरून मी शांत होऊ शकेन. मी कोणाशीच बोलले नव्हते. या सगळ्यातून बाहेर पडून आयुष्यात पुढे कसं जायचं, हाच विचार मी त्या बंद खोलीत करत होते,” असं उर्वशी म्हणाली.

उर्वशी ढोलकिया हिची मुलं आता मोठी झाली आहे. सागर व क्षितीज दोघेही आता २९ वर्षांचे आहेत. उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच ‘पावर ऑफ पांच’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. यात तिने डीजीपी आस्मा मजहर ही भूमिका साकारली होती.