‘कोण होणार करोडपती’चे नवे पर्व सुरू झाले आहे. मराठी अभिनेते सचिन खेडेकर या पर्वाचे होस्ट आहेत. या शोमध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्पर्धकांना मोठी रक्कम जिंकण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. सोमवारी २९ मेपासून सुरू झालेल्या या शोमधील पहिला स्पर्धक मोहित सोनवणे याने २५ लाख रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने खेळ सोडला.
मोहितने १२व्या प्रश्नापर्यंत कोणतीही लाईफलाईन वापरली नाही आणि १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. सचिन खेडेकर यांनी त्याला १३ वा प्रश्न २५ लाख रुपयांसाठी विचारला. तो प्रश्न राजकारणाशी संबंधित होता. ‘सिंगापूर येथे निधन झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोण होते?’ असा तो प्रश्न होता. त्यासाठी अ) वसंतदादा पाटील, ब) वसंतराव नाईक, क) यशवंतराव चव्हाण व ड) सुधाकरराव नाईक हे पर्याय होते. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलं आहे.
“मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”
मोहितने होस्ट सचिन खेडेकर यांना प्रश्न बदलण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी पहिल्या प्रश्नाचे उत्तर सांगितले. त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर ब) वसंतराव नाईक होते. दरम्यान, मोहितने प्रश्न बदलून मागितल्यावर सचिन खेडेकर यांनी त्याला दिलेल्या यादीतून एक विषय निवडण्यास सांगितले आणि त्याने मनोरंजनाची निवड केली. सचिन यांनी मनोरंजन कॅटेगरीतून मोहितला २५ लाख रुपयांसाठी प्रश्न विचारला आणि तो प्रश्न होता – १९५२ मध्ये व्ही. शांताराम यांच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड आणि म्युझिकसाठी कान ग्रो प्री पुरस्कार मिळाला? त्याचे पर्याय अ) दो आंखे बारह हाथ, ब) झनक झनक पायल बाजे, क) अमर भूपाळी, ड) नवरंग होते.
मोहितने १३ व्या प्रश्नावर ऑडियन्स पोल, फ्लिप द क्वेश्चन व व्हिडिओ कॉल अ फ्रेंड या तिन्ही लाईफलाइन्स वापरल्या, पण तो प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला. सचिन यांनी नंतर या प्रश्नाचं बरोबर उत्तर सांगितलं, ते होतं अमर भूपाळी. मोहितने शो सोडल्यावर सचिन खेडेकर यांनी त्याला १२ लाख ५० हजारांचा धनादेश दिला.