‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं नवं पर्व चांगलंच गाजलं. या नव्या पर्वातील नव्या लिटिल चॅम्प्सनी आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे प्रत्येक लिटिल चॅम्प्सचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला होता. या नव्या पर्वाची गुरुकुल ही थीम प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे उत्तमरित्या परीक्षकाची भूमिका सांभाळली. तर या संपूर्ण गुरुकुलची जबाबदारी सुरेश वाडकर सांभाळताना दिसले. काल, २५ नोव्हेंबरला या पर्वाचा महाअंतिम सोहळा झाला आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ २०२३ च्या ट्रॉफिफवर कोपरगावच्या गौरी अलका पगारे हिने नाव कोरलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चा महाअंतिम सोहळा काल मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला खास पाहुणे म्हणून लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे ‘लिटील चॅम्प्स टॉप ६’ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या गौरी अलका पगारेने बाजी मारत विजेती होण्याचा मान पटकावला. गौरीला पारितोषिक म्हणून गौरीला १,५०,००० चा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी १,००,००० चा धनादेश देण्यात आला.

हेही वाचा – मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याची दाहकता दाखवणाऱ्या ‘या’ कलाकृती तुम्ही पाहिल्यात का?

हेही वाचा – शाहरुखच्या बहुचर्चित ‘डंकी’चे बजेट माहितेय का? चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केले ‘फक्त’ एवढे रुपये

महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती गौरी अलका पगारे, प्रथम उपविजेता ठरली मुंबईची श्रावणी वागळे व द्वितीय उपविजेते पद जयेश खरेला मिळाले. मृण्मयी देशपांडे हिच्या सूत्रसंचालनाने या पर्वाला अजूनच बहर आली आणि हा महाअंतिम सोहळा देखील अगदी दिमाखात पार पडला. एकूण काय तर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच’ हे पर्व स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kopargaon gauri alka pagare winner of sa re ga ma pa little champs 2023 pps