क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांची जोडी कायमच चर्चेत असते. २०१७ मध्ये क्रांतीने सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलं. अभिनेत्री नेहमीच तिच्या पतीला खंबीरपणे साथ देताना दिसते. हे दोघंही एकमेकांना कॉलेजच्या दिवसापासून ओळखतात. अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर क्रांती व समीरने मे २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला आता झिया व झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. आज समीर वानखेडेंच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीने खास व्हिडीओ शेअर करत पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
समीर वानखेडेंच्या वाढदिवसानिमित्त क्रांती व समीर दोघंही जोडीने मुंबईतील एका आश्रमात गेले होते. याठिकाणी समीर वानखेडेंनी लहान मुलांसह त्यांचा वाढदिवस साजरा केला. या मुलांना विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. क्रांतीने याची झलक इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे.
क्रांती या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिते, “ज्यांचं आयुष्य प्रेमाने भरलेलं असतं ते लोक नेहमीच देवाच्या सर्वात जवळ असतात. मी आणि समीर वानखेडे आम्ही दोघंही या लहान मुलांबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो आहोत. यांच्याबरोबर वेळ घालवून खरंच खूप जास्त समाधान मिळालं.”
हेही वाचा : सुभेदार ‘असा’ साजरा करणार अर्जुनचा वाढदिवस! सायलीला आठवणार भूतकाळाचा दिवस, पाहा प्रोमो…
दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “खूप छान”, “समीर वानखेडे साहेब तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना”, “क्रांती ताई खूप छान वाटलं तुम्ही प्रेमसदनला भेट दिलीत” अशा कमेंट्स करत चाहत्यांनी क्रांती व समीर वानखेडेंचं कौतुक केलं आहे.