लहान मुलं म्हटलं की त्यांचं घरात दंगा करणं सुरूच असतं. अभिनेत्री क्रांती रेडकरला दोन जुळ्या मुली आहेत. तिच्या मुलीही घरात दंगा करत असतात. क्रांती तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओतून त्यांच्या नवनवीन गोष्टींबद्दल माहिती देत असते. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात मुलींनी पक्ष्यांसाठी घरटं बनवलं. पण गवत न मिळाल्याने तिच्या मुलीने चक्क स्वतःचे केस कात्रीने कापले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन घटस्फोट अन् दोन मुलांची आई असलेली शाहरुख खानची अभिनेत्री तिसऱ्यांदा प्रेमाच्या शोधात; म्हणाली, “मी फालतू…”

समीर व क्रांतीच्या जुळ्या मुलींची नावं झिया व झिडा अशी आहेत. त्यांना लाडाने क्रांती गोदा व छबील म्हणते. “आमच्याकडे आज पक्ष्यांचं घरटं बनवण्याचा प्रोग्राम चालू होता. पण पक्ष्यांसाठी गवत सापडत नव्हतं, त्यामुळे छबीलने स्वतःचे केस कापून गवत बनवलं. योग्यवेळी हा प्रयोग थांबवल्यामुळे छबीलचे केस वाचले आहेत. नाही तर ते पक्षी छबीलच्या केसात राहिले असते. ‘बर्ड बॉक्स’ बनवून तो बाल्कनीमध्ये ठेवायचा त्यांचा प्लॅन होता. नशिबाने मी वेळेत आले,” असं क्रांती या व्हिडीओत म्हणते.

यावेळी क्रांतीने मुलींनी घरात केलेला पसारा दाखवला. मुलींनी खोक्याचं घरटं बनवलं आणि त्यात केस कापून टाकले. शिवाय तिथेच कात्री, जुना ड्रेस असं सामान पडलं होतं. दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘क्रांती लय लक्ष द्यावं लागत मुलांकडे, नाहीतर ते आपलंही टक्कल करतात,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर अनेकांनी या चिमुकल्या मुलींच्या पक्षीप्रेमाचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar sameer wankhede twin daughters cut hair for birdbox see video hrc