गोविंदाची भाची व अभिनेत्री आरती सिंहचं गुरुवारी (२५ एप्रिलला) लग्न झालं. आरती सिंहने बिझनेसमन दिपक चौहानशी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्नगाठ बांधली. या लग्नाला अभिनेता गोविंदाने हजेरी लावली. आरतीचा भाऊ कृष्णा अभिषेक व गोविंदा यांच्या काही वर्षांपासून वाद आहेत, त्यामुळे ते बोलत नाहीत. पण तरीही गोविंदाने लग्नात भाचीला आशीर्वाद दिले व कृष्णाच्या जुळ्या मुलांची भेट घेतली.

कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगच्या लग्नात गोविंदाच्या अनपेक्षित हजेरीची सध्या सिनेजगतात चर्चा आहे. गोविंदाच्या हजेरीमुळे त्याच्या व कृष्णा यांच्यातील आठ वर्षांचं भांडण संपलं. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह आणि गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील शाब्दिक वादानंतर हे भांडणं वाढलं आणि त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं होतं. आरतीच्या लग्नाआधी कश्मीराने म्हटलं होतं की गोविंदा या लग्नाला आले तर ती त्यांच्या पाया पडून माफी मागेल, आता तिने खरोखरंच गोविंदांची पाया पडून माफी मागितली आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
zakir hussain account first post after demise
झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…

Video: मामा-भाच्याचं वैर, पण भाचीच्या लग्नाला पोहोचला गोविंदा; आरती सिंहबद्दल म्हणाला…

‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीराने गोविंदा लग्नात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कश्मीरा बाहेर पाहुण्यांचे स्वागत करत होती, तर कृष्णा आरतीबरोबर लग्नस्थळी होता. गोविंदा कार्यक्रमस्थळी पोहोचताच आपण वाकून नमस्कार केल्याचं तिने सांगितलं. “मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना स्टेजवर घेऊन गेले. जेव्हा मी त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले तेव्हा मामांनी मला थांबवलं आणि ‘जीते रहो, खुश रहो.’ असं म्हटलं. मी त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले. हीच माफी आहे,” असं कश्मीरा म्हणाली.

वादानंतर अनेक वर्षांपासून अबोला, तरीही मामा गोविंदाने भाचीच्या लग्नाला लावली हजेरी; कृष्णा अभिषेक म्हणाला…

लग्नात कश्मीराने तिच्या सहा वर्षांच्या जुळ्या मुलांचीही गोविंदाशी ओळख करून दिली. गोविंदाने मुलांना मिठी मारली आणि आशीर्वाद दिला, हे पाहून आपण भावुक झाल्याचं कश्मीराने सांगितलं. या लग्नात गोविंदा एकटा आला होता, त्याची पत्नी सुनीता लग्नाला नव्हती. यावर कश्मीरा म्हणाली, “त्या नाही येणार हे अपेक्षित होतं आणि त्यांना रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

Video: गोविंदाची भाची झाली चौहानांनी सून, आरती सिंहच्या लग्नाला कलाकारांची मांदियाळी, पाहा व्हिडीओ

२०१८ मध्ये गोविंदाने एका शोच्या निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. यावर “लोक पैशांसाठी कुठेही नाचतात” असं ट्वीट कश्मिराने केलं होतं. यानंतर सुनीता व कश्मीरा यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. तर त्यापूर्वी मामाने सिनेसृष्टीत येण्यास मदत केली नसल्याचं कृष्णा म्हणाला होता, त्यावरून गोविंदा व त्यांच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली होती.

Story img Loader