सध्या जुन्या मालिका बंद होऊन नव्या मालिका सुरू होण्याचं सत्र सुरू आहे. काही मालिका कमी टीआरपीच्या कारणास्तव बंद केल्या जात आहेत. तर काही मालिका कथा पूर्ण होत असल्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी एक लोकप्रिय मालिका ऑफ एअर झाली. या मालिकेचे प्रेक्षक सध्या नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. “अजून खूप दिवस ही मालिका आम्हाला बघायची होती”, “मालिकेचा सीझन २ घेऊन या. इतक्या लवकर नका बंद करून”, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘आई कुठे काय करते’ला हरवल्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला टक्कर द्यायला येणार ‘ही’ मंडळी

IND vs BAN Test Best Fielder Of The Series Yashasvi Jaiswal Mohammed Siraj Wins Medal India Dressing Room Video
IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Ian Chappell Statement on Jasprit Bumrah Rishabh Pant innings in Border Gavaskar Trophy Test Series sports news
बुमरा, पंतची लय महत्त्वाची; बॉर्डरगावस्कर मालिकेबाबत चॅपल यांचे विधान
Emmy Award nomination for The Night Manager web series
‘द नाइट मॅनेजर’ वेबमालिकेला एमी पुरस्कारासाठी नामांकन; २५ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये सोहळा
Music release of the movie Naad in the presence of Prasad Oak
प्रसाद ओकच्या उपस्थितीत ‘नाद’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या

दोन दिवसांपूर्वी बंद झालेली ही लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’. ही मालिका १७ जुलै २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. सिंधुदुर्गातील आरवली गावाचे ग्रामदैवत ‘श्री देव वेतोबाची कथा’ या मालिकेतून दाखवण्यात आली होती. खरंतर वेतोबा म्हणजे भूतनाथ. पण कोकणात संकटसमयी भक्तांच्या हाकेला देवासारख्या धावून जाणाऱ्या वेतोबाची गोष्ट दाखवण्यात आली होती. प्रेक्षकांना ही गोष्ट अल्पावधीतच पसंतीस उतरली होती. पण १४ जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. १ तासांच्या विशेष भागाने मालिकेचा शेवट झाला.

‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट केल्या आहेत. वेतोबाची भूमिका साकारणारा अभिनेता उमाकांत पाटील याने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानत एक पोस्ट लिहिली आहे. “रसिक प्रेक्षकहो… तुमची लाडकी मालिका ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ तुमचा निरोप घेतेय. ज्याची कुठेतरी सुरुवात आहे, त्याचा शेवट असतोच आणि तो योग्य वेळी घेतलेला कधीही चांगला. पण आपल्यात जो अनादी धागा आहे-वेतोबा, तो कायम आपल्यासोबत असणार आहे,” असं उमाकांतने मालिकेचा शेवटचा प्रोमो शेअर करत लिहिल आहे.

उमाकांतच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीने लिहिल आहे, “ही मालिका अशीच सुरू पाहिजे. मी ही मालिका कधीच चुकवतं नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल, “एवढ्या लवकर संपेल अशी अपेक्षा नव्हती…असो खूपच सुंदर मालिका होती.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल, “का शेवट?” अशा अनेक प्रतिक्रिया उमाकांतच्या पोस्टवर मालिकेच्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मधून ‘हा’ सदस्य झाला बेघर, नाव ऐकताच प्रेक्षकांना झाला आनंद

दरम्यान, ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेच्या वेळेत कालपासून एक नवी मालिका सुरू झाली आहे. ‘मुलगी पसंत आहे’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, संग्राम समेळ, कल्याणी तिभे या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.