काही महिन्यांपूर्वी झी मराठीवर ‘लोकमान्य’ ही मालिका सुरू झाली. ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर त्याच्या जागी नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेत अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री स्पृहा जोशीने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. परंतु आता ही मालिका बंद होणार असल्याचं समोर आलं आहे.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

आणखी वाचा : स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, दोघांमधील नात्याबद्दल कळल्यावर ‘अशी’ होती मुग्धा वैशंपायनची प्रतिक्रिया

ही मालिका सुरू झाली तेव्हा या मालिकेचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं. वेगळ्या विषयावरील मालिका घेऊन आल्याबद्दल प्रेक्षकांनी वाहिनी आणि निर्मात्यांचंही कौतुक केलं. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाले. या मालिकेतील कलाकार सेटवर घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडिया वरून चाहत्यांशी शेअर करत असतात. पण आता टीआरपीच्या अभावी झी मराठीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”

ही मालिका कधी बंद होईल आणि त्या जागी कोणता नवीन कार्यक्रम सुरू होईल हे अजून समोर आलेलं नाही. परंतु ही ऐतिहासिक मालिका बंद होणार असल्याने सोशल मीडियावरून या मालिकेचे प्रेक्षक त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत.