Actress Asha Sharma Passed Away: मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांनी रविवारी (२५ ऑगस्टला) दुपारी अखेरचा श्वास घेतला. आशा शर्मा या लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. त्यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. आशा शर्मा या ८८ वर्षांच्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील अभिनेत्री आशा शर्मा यांचं निधन झालं आहे. आशा यांनी प्रभास आणि क्रिती सेनॉनच्या ‘आदिपुरुष’ मध्येही काम केलं होतं. रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला व चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ८८ वर्षांच्या आशा शर्मा यांच्या निधनाची माहिती ‘सिंटा’ने (CINTAA) दिली. आशा शर्मा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अभिनेत्री पूजा गौरने आशा शर्मांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

‘सिंटा’ने केली पोस्ट

२५ ऑगस्ट रोजी ‘सिंटा’ने आशा शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एक्सवर एक फोटो पोस्ट करून आशा यांच्या निधनाची माहिती दिली. दरम्यान, आशा शर्मा यांचे निधन कशामुळे झाले, तसेच त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दलही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

धर्मेंद्र- हेमा मालिनींसह केलं होतं काम

आशा शर्मा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. यापैकी बहुतांश भूमिका या ऑनस्क्रीन आई किंवा आजीच्या होत्या. त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याबरोबर काम केलं होतं. ‘दो दिशां’मध्ये आशा शर्मा यांची भूमिका खूप गाजली होती. आशा शर्मा यांनी ‘मुझे कुछ कहना है’, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘हम तुम्हारे हैं सनम’मध्येही काम केलं होतं. त्या ‘कुमकुम भाग्य’, ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ आणि ‘एक और महाभारत’ सारख्या टीव्ही मालिकेत झळकल्या होत्या.

एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

‘आदिपुरुष’ ठरला शेवटचा चित्रपट

आशा शर्मा अखेरच्या ओम राऊत दिग्दर्शत ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात प्रभास व क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.