अभिनेता शक्ती अरोराने मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवला. ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत साकारलेल्या करण लुथरा या भूमिकेमुळे शक्ती अरोराला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या शक्तीने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शक्ती अरोराने जगातील टॉप ब्रँडपैकी एक असलेली मर्सिडिज कार त्याच्या घरी आणली आहे. मर्सिडीज बेंझ ४०० डी ४ मॅटिक ही कार खरेदी केली आहे. मर्सिडीज बेंझ लँडमार्क कार्स या इन्स्टाग्राम पेजवरुन शक्ती अरोराचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये शक्ती त्याच्या कुटुंबियांसाठी कार खरेदी करण्यासाठी आल्याचं दिसत आहे. या कारची किंमत तब्बल १.१९ कोटी रुपये इतकी आहे.

हेही वाचा>> Video: आधी हाय हिल्स काढले अन् मग अनवाणी पायांनीच ‘नाटू नाटू’वर थिरकली आलिया भट्ट, अभिनेत्रीचा रश्मिका मंदानाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> Video: नागराज मंजुळेंचा डॅशिंग लूक, आकाश-सायलीची केमिस्ट्री अन्…; ‘घर बंदूक बिरयानी’ टीमशी खास गप्पा

शक्ती अरोराने मर्सिडीज कार खरेदी केल्यानंतर अभिनेत्री व सहकलाकार श्रद्धा आर्याने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रद्धाने शक्तीचा नव्या कोऱ्या मर्सिडीज गाडीबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रद्धा आर्याने कुंडली भाग्य मालिकेत शक्ती अरोराच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’, ‘ये हे मोहोबत्ते’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘दिल मिल गए’, ‘मन मे है विश्वास’, ‘ये है आशिकी’, ‘कुंडली भाग्य’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kundali bhagya fame actor shakti arora buy new mercedes benz car kak