सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय राहून काही ना काही करत सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेत असतात. यासाठी अनेक जण काहीतरी हटके करताना दिसतात. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा आर्या हिने चक्क टॉवेल गुंडाळून कॅमेरा समोर डान्स केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
सध्या ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी श्रद्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावरून विविध पोस्ट शेअर करत होती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. त्याचप्रमाणे विविध रिल्समधून ती मजेशीर कॉन्टेन्टही शेअर करत असते. पण आता चक्क एका रीलसाठी ती टॉवेल गुंडाळून कॅमेरासमोर नाचली.
आणखी वाचा : काळं जॅकेट, डोक्यावर हेल्मेट…’या’ आघाडीच्या अभिनेत्रीने मुंबईच्या रस्त्यांवर लुटला बाईक राईडचा आनंद
श्रद्धाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने लिहिलं होतं, “जेव्हा तुमचा बॉस तुम्हाला विचारतो की तुला कामावर पोहोचायला उशीर का झाला तेव्हा मी…” हा व्हिडीओ सुरू असताना मागून ९०च्या दशकातील हिट गाणी ऐकू येत आहेत. तर त्या गाण्यांवर श्रद्धा नाच करताना दिसत आहेत. ही गाणी ऐकत ती एन्जॉय करत आवरल्यामुळे तिला कामावर पोहोचायला उशीर झाला असं तिला यातून सांगायचं होतं. दरम्यान ती गुलाबी रंगाचा टॉवेल गुंडाळून या गाण्यांवर थिरकली. तर त्यानंतर ती कपडे परिधान करतानाही दिसतेय.
हेही वाचा : “आम्ही रागात बेडवर…”, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर अभिनेत्रीचे पतीसोबत झाले भांडण
तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तिच्या बोल्डनेसचं कौतुक केलं आहे तर आणि काही जणांनी या व्हिडीओमुळे तिच्यावर टीकाही केली. आता या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.