Shraddha Aarya shares New Born Baby Photo : यंदा सना सय्यद, अदिती शर्मा, सोनाली सेहगल अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी आपल्या कुटुंबात चिमुकल्या सदस्यांचे स्वागत केले. टीव्हीवरील गाजलेली मालिका ‘कुंडली भाग्य’मध्ये प्रीता ही भूमिका साकारून अभिनेत्री श्रद्धा आर्या लोकप्रिय झाली. श्रद्धा नुकतीच आई झाली आहे. तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. तिला एक मुलगा व एक मुलगी झाले. श्रद्धाने तिच्या बाळाबरोबरचा एक फोटो पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. श्रद्धाच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
श्रद्धा लग्नाच्या तीन वर्षांनंतर आई झाली. तिने २९ नोव्हेंबर रोजी जुळ्यांना जन्म दिला. तिने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर करून मुलांच्या जन्माबद्दल माहिती दिली होती. आता तिने पहिल्यांदाच तिच्या एका बाळाबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. फोटोत श्रद्धा तिच्या १० दिवसांच्या बाळाला घेऊन बसलेली दिसत आहे.
हेही वाचा – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
े
पाहा फोटो-
दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा आर्याने २०२१ मध्ये नौदल अधिकारी राहुल नागल याच्याशी लग्न केलं. ऑगस्ट महिन्यात त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. या जोडप्याने लग्नानंतर तीन वर्षांनी आपल्या जुळ्या बाळांचं स्वागत केलं. श्रद्धाने मागील आठवड्यात तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून ती आई झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती.
श्रद्धाने बेडशेजारी लावलेल्या फुग्यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या फुग्यांवर ‘बेबी बॉय’ व ‘बेबी गर्ल’ लिहिलेलं दिसत होतं. तिच्या बाळांचा जन्म २९ नोव्हेंबर रोजी झाला. श्रद्धाला एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी अपत्ये झाली. “दोघांच्या येण्याचे आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे,” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं होतं.