Shraddha Arya Blessed with Twins : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्या आई झाली आहे. श्रद्धा आता जुळ्या बाळांची आई झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून तिच्या बाळांच्या जन्माची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.
श्रद्धा लग्नाच्या तीन वर्षांनंतर श्रद्धा व तिचा पती राहुल नागल आई-बाबा झाले आहेत. श्रद्धाने तिच्या बेडशेजारी लावलेल्या फुग्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या फुग्यांवर ‘बेबी बॉय’ व ‘बेबी गर्ल’ लिहिलेलं दिसत आहे. तिच्या बाळांचा जन्म २९ नोव्हेंबर रोजी झाला. श्रद्धाला एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी अपत्ये झाली आहेत. “दोघांच्या येण्याचे आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे,” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा – लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याने दिली गुड न्यूज; लग्नाच्या १० वर्षानंतर केलं दुसऱ्या बाळाचं स्वागत
पाहा व्हिडीओ –
‘कुंडली भाग्य’मधील प्रीता म्हणजेच श्रद्धा आता जुळ्या बाळांची आई आहे. आद्रिजा रॉय, स्वाती कपूर, रुही चतुर्वेदी, क्रिष्णा मुखर्जी, ट्विंकल वशिष्ठ या कलाकारांनी कमेंट्स करून श्रद्धाचं अभिनंदन केलं आहे. श्रद्धाच्या या पोस्टवर चाहत्यांनीही लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
तीन वर्षांपूर्वी श्रद्धाने राहुलशी बांधली लग्नगाठ
अभिनेत्री श्रद्धा आर्या व राहुल नागल यांनी २०२१ मध्ये लग्न केलं. श्रद्धा अभिनयक्षेत्रात काम करत आहेत, तर तिचा पती राहुल नौदल अधिकारी आहे. दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आता तीन वर्षांनी हे दोघेही आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी एक मुलगा व एक मुलगी अशा जुळ्या बाळांचं आगमन झालं आहे.