Ruhi Chaturvedi Blessed with Baby Girl: ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. ‘कुंडली भाग्य’ मालिकेतील तीन अभिनेत्रींनी २०२४ मध्ये गुड न्यूज दिली होती. या तिन्ही अभिनेत्रीच्या घरी मुलींचा जन्म झाला आहे. या मालिकेत शर्लिन खुराना मल्होत्रा नावाचे पात्र साकारणारी रुही चतुर्वेदी आई झाली आहे. रुहीने मुलीला जन्म दिला आहे.
रुही चतुर्वेदीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. रुही चतुर्वेदी आई झाली आहे. श्रद्धा आर्या, सना सय्यद पाठोपाठ ‘कुंडली भाग्य’मधील तिसरी अभिनेत्री रुहीदेखील आता चिमुकल्या बाळाची आई झाली आहे. श्रद्धा आर्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन जुळी अपत्ये झाली, तर सना सय्यदला मुलगी झाली. आता रुहीच्या घरी देखील एक गोंडस परी आली आहे. तिने एक खास पोस्ट करून ही गुड न्यूज शेअर केली.
रुही व तिचा पती शिवेंद्र सैनीयोल यांच्या घरी ९ जानेवारी २०२५ रोजी चिमुकल्या लेकीचं आगमन झालं आहे. रुहीच्या या पोस्टवर शक्ती अरोरा, डेझी शाह, सेहबान अझीम, स्वाती कपूर, श्रद्धा आर्या, पूजी बॅनर्जी, मानसी श्रीवास्तव यांनी कमेंट्स करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
पाहा पोस्ट –
रुही चतुर्वेदी लग्नानंतर पाच वर्षांनी आई झाली आहे. रुहीने शिवेंद्र सैनीयोलशी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. ३१ वर्षीय रुहीने ११ नोव्हेंबरला सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून ती गरोदर असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.
रुही चतुर्वेदीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती मांगल्य भाग्यम, आलाप, कंगना, पगली, लव्ह यू टर्न आणि कुंडली भाग्य या मालिकेसाठी ओळखली जाते. तिने २०१९ मध्ये शिवेंद्रशी लग्न केलं होतं. या जोडप्याने आता आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.