छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीतील एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार कायमच चर्चेत असता. नुकतंच या कार्यक्रमातील अभिनेता प्रसाद खांडेकर हा ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेला गेला होता. त्यानिमिताने त्याने विविध पोस्ट केल्या होत्या. आता त्याने अमेरिकेतील पुढचा प्रयोग कुठे होणार, याबद्दलची माहिती दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री विशाखा सुभेदार निर्मित ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होणार आहेत. हे नाटक मातृत्वाच्या संवेदनशील विषयावर आधारित आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार झळकताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी ही संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाली होती.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव महिनाभर राहणार लेकापासून दूर, कारण…

नुकतंच प्रसाद खांडेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर त्याने एक हटके कॅप्शनही दिले आहे.

“गुड बाय लॉस एंजेल्स, खूप खूप धन्यवाद…एवढ्या सुंदर पाहुनचाराबद्दल, Day – 7 अमेरीका दौरा, लॉस एंजेल्सच्या यशस्वी प्रयोगानंतर Denver कडे कूच”, अशी पोस्ट प्रसाद खांडेकरने केली आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकातून आई होण्याचा संवेदनशील विषय अगदी विनोदी पद्धतीने मांडण्यात येत आहे. आईपण हे महान आहेच, पण हे सुख अनुभवण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर तो प्रवासही त्या आई होणाऱ्या स्त्रीसाठी सुखद असायला हवा, हलकाफुलका असायला हवा. याच भावनेतून हे नाटक रंगमंचावर साकारण्यात आलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kurrrr marathi drama will be held at this place in america actor prasad khandeker share post nrp