‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून कुशल बद्रिके घराघरांत पोहोचला. अनेक नाटक, मालिका आणि कोमॅडी शोमध्ये आपलं कौशल्य दाखवत कुशलने प्रेक्षकांचं मन जिंकलं. कुशलला विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणूनही ओळखलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. शोच्या शेवटच्या दिवशी भावनिक होत कुशलने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला अभिनेत्याने “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले काही आमुचे तर क्षमा असावी” हे गाणं जोडलं होतं. आता पुन्हा एकदा ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील त्याचे फोटो शेअर करत कुशल बद्रिके व्यक्त झाला आहे.

हेही वाचा… लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने पती सिद्धेशने बनवला पूजा सावंतसाठी खास पदार्थ; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

कुशलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तो काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतोय. कुशलचे हे फोटो ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील दिसतायत. या पोस्टला कॅप्शन देत कुशलनं लिहिलं, “कधी कधी आपल्या आयुष्यातून निघून गेलेली
माणसं पुन्हा भेटावीत असं वाटत राहतं, पुढे निघून गेलेल्यांना हाक मारून थांबवावसं वाटतं आणि मागे राहिलेल्यांसाठी इथे सावलीत थोडा वेळ थांबावसं वाटतं. पण, हे फक्त आपल्यालाच वाटत असेल तर… ?”

कुशलनं पुढे लिहिलं, “एखादं नातं तेव्हाच टिकतं, जेव्हा त्या नात्यातील दोन्ही व्यक्तींना एकमेकांविषयी समान भावना असतात”, म्हणून आपण चालत राहतो एखाद्याची हाक ऐकू येईपर्यंत आणि एखादा कुणीतरी सावलीत वाट बघताना दिसेपर्यंत.” अशा काहीशा शब्दांत कुशलने आपल्या भावना व्यक्त केल्या. “कुछ लोग एक रोज जो बिछड जाते है” हे गाणं कुशलने या फोटोजला जोडलं आहे.

हेही वाचा… अदिती राव हैदरीच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान ‘हीरामंडी’च्या कार्यक्रमात सूत्रसंचालकाने केलेलं विधान चर्चेत

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा असल्याने या कार्यक्रमाची अनेक प्रेक्षक आठवण काढतात. कुशलच्या या पोस्टवर ‘चला हवा येऊ द्या’च्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “चला हवा येऊ द्या पुन्हा कधी सुरू होणार”, तर दुसऱ्याने लिहिलं, “तू कुठेही जाऊ नकोस, तुझी आम्हाला अजून गरज आहे. ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये नीलेश साबळे पुन्हा परत येईल.”

हेही वाचा… शाहरुख खानच्या मन्नतला मागे टाकत सर्वात महागडं ठरणार रणबीर कपूरचं नवीन घर? बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव

दरम्यान, कुशलच्या कामाबद्दल सागायचं झालं तर आत्तापर्यंत कुशलने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘पांडू हवालदार’, ‘बाप माणूस’, ‘स्लॅम बूक’, ‘रावरंभ’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. काही महिन्यांपूर्वीच कुशलचा ‘स्ट्रगलर्स साला’चा तिसरा सीझन प्रदर्शित झाला. कुशल आता सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या हिंदी विनोदी कार्यक्रमात आपली विनोदी कौशल्ये दाखवत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kushal badrike emotional post fans asked about chala hawa yeu dya comeback dvr