‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अनेकदा तो त्याच्या कामाचे अपडेट, बायको किंवा सहकलाकरांबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोलेल्या कुशल बद्रिकेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच अनेकदा त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
कुशल बद्रिकेने आताही एक मजेदार व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने डॉ. निलेश साबळे यांचाही उल्लेख केला आहे. त्याची ही पोस्ट बॉलिवूड अभिनेता संजय दत्तबद्दल आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा- “प्रत्येक नवऱ्याची अवस्था…”, प्रसाद ओकचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
कुशल बद्रिकेची पोस्ट-
“मला काही संजूबाबा जमत नाही पण आमचा डॉ. निलेश साबळे म्हणाला नुसतं “अं…अं…” करत रहा बास, बाकी आपल्या प्रेक्षकांवर विश्वास ठेव ते कपड्यावरून ओळखतीलच तू कुणाची भूमिका करतोयस ते.”
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कुशल बद्रिके ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील संजय दत्तच्या पात्राची नक्कल करताना दिसत आहे. त्याच्या जोडीने श्रेया बुगडे आणि भाऊ कदम यांनी कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग साधत व्हिडीओमध्ये धम्माल आणली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.
आणखी वाचा- “खेळ सोडता येतो, आयुष्य कसं सोडायचं…?” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान ‘चला हवा येऊ द्या’ हा महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. याच कार्यक्रमातून भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर करांडे, श्रेया बुगडे यांसारख्या अनेक कलाकारांना वेगळी ओळख मिळाली आहे. आता मराठी कलाकारांच्या बरोबरीने बॉलिवूडचे कलाकारही चित्रपटांच्या प्रमाोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसतात.