झी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री शिवानी नाईक मालिकेत मुख्य भूमिकेत असून या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील एक व्हिडीओ अभिनेता कुशल बद्रिकेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नायिका तिच्या मामाला उठवताना दिसत आहे. हा व्हिडीओ फास्ट फॉरवर्ड केलेला असून नायिका “ह्याच्या मामा तू उठ”, असं म्हणताना दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘खोखो’ चित्रपटातील डायलॉगही आहे. कुशल बद्रिकेने या पोस्टला ‘झी मराठीच्या मालिकेत सिद्धार्थचा जाधवचा डायलॉग’, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा >> Video : ‘आई कुठे काय करते’मध्ये अप्पांचा अपघात होणार? नव्या वळणामुळे मालिका चर्चेत

हेही वाचा >> विराट कोहलीचा बेडवरील ‘तो’ फोटो पोस्ट करत अनुष्काने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…

कुशलच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही फार मजेशीर कमेंट केल्या आहेत. ‘हा डायलॉग लोकप्रिय करण्याचं संपूर्ण श्रेय कुशल बद्रिके यांना जातं”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत “हाहाहा खतरनाक”, असं म्हटलं आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजीही कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केले आहेत. कुशलने शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> चिरंजीवींसह उर्वशी रौतेला आयटम सॉंग करताना दिसणार, ‘वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटात दाखवणार जलवा

कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या मालिकेतून प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. त्याने अनेक चित्रपटांतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kushal badrike post on zee marathi serial appi amchi collector and siddharth jadhav goes viral kak