गेली अनेक वर्ष त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य असलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेकडे पाहिले जाते. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. नुकतंच कुशलने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा- Video : “चिपळूण आमचं गाव रे…”, ओंकार भोजनेच्या कवितेचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कुशल बद्रिके हा इन्स्टाग्रामवर सक्रीय असतो. तो कायमच विविध पोस्ट करताना दिसतो. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कुशलचा मुलगा गंधार शाळेतून घरी येताना दिसत आहे. मुख्य म्हणजे गंधार भिजत पावसाचा आनंद घेत येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कुशलने लिहिलं आहे. “आभाळात ढगांमधून वाहत जाणारा पाउस आवडणं, हे बहुतेक आमच्या रक्तामधून वहात आलंय.”
कुशलच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची देखील पसंती मिळताना दिसत आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. अनेकदा कुशल आपली बायको सुनयना आणि मुलगा गंधारबरोबर वेगवेगळे रील बनवत असतो. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते.