‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशल बद्रिकेने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने एका कवितेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्याने शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कुशल बद्रिके हा ‘चल हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. आज सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अर्थात मनोरंजन क्षेत्रातील त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने काही फोटोही शेअर केले आहेत. याला त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली
कुशल बद्रिकेची पोस्ट
“कवितांचा कार्यक्रम आणि मैफिलीत फरक तो काय ?
तर कवितांच्या कार्यक्रमात कवी आपली पुस्तक उघडतो आणि स्वतःच्या एकाहून एक अशा अफलातून रचना ऐकवतो, ज्या कवितेंमध्ये पृथ्वीला गवसणी घालण्याची आणि आभाळाला भेदून टाकण्याची ताकद असते.
हे असलं “वादळ” ते शब्दांमधून हळूहळू आपल्यात उतरवत असतात.
मैफलित असं काही होत नाही इथे “कवी” कवी राहत नाही वा ” प्रेक्षक” प्रेक्षक राहत नाहीत,
“प्रेक्षागृहातला अंधाराचा हात स्टेजवरचा प्रकाश कधी धरतो” कळत नाही आणि सगळेच मग रसिक होऊन जातात, आणि व्यक्त होत राहतात.
व्यक्त होणारा पुस्तकांऐवजी स्वतःचं काळीज उघडून समोर ठेवतो, मग त्याचा एकएक-एकएक कप्पा उलघडून अलगद, आपल्या हरएक जखमेवर फुंकर घालत राहतो.
अशा मैफलीतून घरी जाताना आपण काहीच घेऊन जात नाही उलट स्वतःला थोडसं विसरूनच येतो मैफलीत.
अशाच एका मैफलीला जाऊन आलो परवा “संदीप वैभव आणि कविता”
एकदा नक्की या ह्या मैफलीला
“पाण्यात पोहण्यात मौज असतेच, पण डुंबून जाण्यातही मौज आहे”! हे सांगणारे क्षण कमीच येतात आयुष्यात”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…
दरम्यान भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘पांडू’ हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. यातील ‘दादा परत या ना हसवा ना…’ हे गाणे तुफान हिट ठरले आहे. या गाण्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. ‘पांडू’ या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची आहे. या चित्रपटात भाऊ कदम हे पांडूच्या भूमिकेत तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत झळकत आहे.