मराठी मनोरंजन विश्वातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या काही पुरस्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘झी गौरव पुरस्कार’ (Zee Chitra Gaurav). या ‘झी चित्र गौरव २०२५’ (Zee Chitra Gaurav 2025) पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण शनिवारी ८ मार्च , करण्यात आलं. यंदा सोहळ्याचं २५ वं वर्ष असल्यानं अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते. या ‘झी चित्र गौरव’ (Zee Chitra Gaurav 2025) पुरस्काराचं सूत्रसंचालन अभिनेते रितेश देशमुख व अमेय वाघ यांनी केलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन व सुप्रिया पिळगांवकर, महेश कोठारे, मृणाल कुलकर्णी, महेश मांजरेकर, भरत जाधव अशा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे साहजिकच या सोहळ्याची शोभा वाढवली होती. धमाल डान्स परफॉर्मन्सेस आणि विनोदी स्किट्सनी त्यात आणखी भर घातली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी चित्र गौरव’ (Zee Chitra Gaurav 2025) पुरस्कारांमध्ये वर्षभरात मराठी मनोरंजन विश्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. त्याशिवाय मराठी मनोरंजन विश्वातील अनेक चित्रपटांचा व चित्रपटांतील तंत्रज्ञ मंडळींचाही सन्मान करण्यात आला. विजयी कामगिरी करणाऱ्या या मंडळींवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच अभिनेता कुशल बद्रिकेनं (Kushal Badrike) आपल्या एका मित्रासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘झी चित्र गौरव’ (Zee Chitra Gaurav 2025) पुरस्कार सोहळ्यात ‘घरत गणपती’ या चित्रपटासाठी सुमित पाटीलला (Sumit Patil) सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

त्यानिमित्तानं कुशलनं (Kushal Badrike) सुमितबरोबरचा खास फोटो शेअर करीत म्हटलं आहे, “यार तू मिळवलेला पुरस्कार इतक्या आवडीनं मला दाखवायला आणलास. मला कसलं भारी वाटलं. कोकणातले गणपती उत्सव हा अतिशय जवळचा विषय. त्यावेळी होणाऱ्या घरातल्या वातावरणातील ‘घरत गणपती’ (Gharat Ganpati) हा सिनेमा! या सिनेमाचा कलादिग्दर्शक माझा मित्र सुमित पाटीलला यंदाचा ‘झी गौरव पुरस्कार’ (Zee Chitra Gaurav 2025) मिळाला. आनंद आहेच; पण त्याच्या एवढ्या वर्षांच्या कष्टाचं आज बाप्पानं हे फळ दिलं”.

पुढे कुशलनं (Kushal Badrike) असं म्हटलं, “गणपती तयार करण्यापासून ते कोकणातील चित्रकथी, गंजिफा कला आणि पारंपरिक सजावट कायम मनात चित्र करून राहिली. हातांनी केलेले कळीचे मोदक तर मी स्वतः पाहिले आहेत आणि खाल्लेही आहेत. तुझ्या हातात एक जादू आहे. आज तुझा हा पुरस्कार तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. तुझ्यातला कलाकार बाप्पा कायम असाच जपो”. कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करीत सुमितला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय कुशलचंही त्यांनी कौतुक केलं आहे.