कुशल ब्रदिके हा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. उत्तम अभिनय व त्याला विनोदाची अचूक जोड या जोरावर कुशलने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्ट्सबद्दल तो पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो.

अनेकदा कुशल कुटुंबियांबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. नुकतंच कुशलने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. कुशलने पत्नीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

हेही वाचा>> “मी तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला”, प्रसिद्ध मराठी कोरिओग्राफरने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाला, “सातवीत घराबाहेर पडल्यानंतर तीन दिवस…”

कुशल बद्रिकेची पत्नीसाठी खास पोस्ट

मला चहा खूप आवडतो आणि मी तो पितोही खूप. म्हणूनच कदाचित आपल्या लग्नाआधी काही नातेवाईक, माझ्याबद्दल तुला म्हणाले होते “he is not your cup of tea”. तरीही चहाच्या टपरीवरच्या भेटीपासून ते लग्नाच्या गाठीपर्यंतचा आपला प्रवास झालाच.

तू लक्ष्मीच्या पावलांनी “भाड्याच्या खोलीत” आलीस आणि नटराजाच्या पावलांनी “स्वतःच्या घरात” नाचू लागलीस. आता आपल्या घरात चहापाण्याला आलेल्या नातेवाईकांसोबत तू बसतेस आणि बऱ्याचदा त्यांना कॉफी पाजतेस. बहुतेक तुलाही पटलंय…I am not your cup of tea…I am your “cappuccino”

बघ, संपल्यावरही रेंगाळून राहीन “चवीसारखा”, तुझ्या आयुष्यात. एक गोड आठवण बनुन…….लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हेही वाचा>> अमोल कोल्हेंना दुखापत! घोड्याचा पाय दुमडला अन्…; ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान नेमकं काय घडलं?

कुशल बद्रिकेने पत्नीसाठी केलेली ही पोस्ट चर्चेत आहे. कुशलने अनेक मालिका व चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Story img Loader