अभिनेता कुशल बद्रिके ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला. गेली अनेक वर्ष त्याने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास सोपा नव्हता, या संपूर्ण प्रवासात त्याला त्याच्या घरच्यांची खंबीर साथ मिळाली. आता नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कुशलने काही संकल्प केले आहेत. अभिनेत्याने नव्या वर्षात कोणते संकल्प केले आहेत जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुशल बद्रिकेने २०२३ या वर्षात वैयक्तिक आयुष्यात व व्यावसायिक आयुष्यात आलेले अनुभव सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केले आहेत. तसेच यामध्ये अभिनेत्याने नवीन वर्षाच्या संकल्पाविषयी देखील सांगितलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17 : “पाय चाटू शकतेस”, आयेशा खानचं अपमानास्पद उत्तर ऐकून अंकिता लोखंडे संतापली; म्हणाली, “तू…”

कुशल बद्रिकेची पोस्ट

या सरत्या वर्षाने जाताना बऱ्याच गोष्टी सोबत नेल्या.
काही माणसं मनात घरं करुन कायमची निघून गेली, त्या रिकाम्या घरांच्या जागा आता कधीच भरुन काढता येणार नाहीत.
दरवर्षीप्रमाणे हे वर्ष सुद्धा, “व्याजाचा हप्ता” जावा तसा माझ्यातला थोडा “innocence” घेऊन गेलंच.
मी invest केलेल्या “FD” प्रमाणेच माझ्यातही “maturity” आली नाही, ती नाहीच ! बहुतेक कुठे “invest करावं” आणि कुठे “invest व्हावं” हे मला खरंच कळत नाही.
मित्रांनी सांगितलंय नवीन वर्षात जाताना कोणत्याच emotions चं baggage सोबत घेऊन जाऊ नकोस, म्हणून माझ्यातल्या मलाच थोडा मागे ठेऊन निघालोय .
बाकी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा.
येत्या वर्षात व्याज थोडं कमी लागू दे , “investment” ला “maturity” येऊ दे,
आणि मनातली रिकामी घरं भाडेतत्वावर का होईना, पण जाऊदेत.
मनाच्या उंबरठ्यावर पावलांची ये जा रहायला हवी. (सुकून)

कुशल बद्रिके

दरम्यान, कुशलच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने, “दादा तू जितका चांगला विनोदी कलाकार आहेस तसाच तू चांगला लेखक देखील होऊ शकतो…तुझं लिखाण खूप छान आहे जमलं तर पुस्तक लिही अशी कमेंट केली आहे.” दुसऱ्या एक युजर म्हणतो, “तू खरंच एखादी सुंदर स्क्रिप्ट लिहू शकतो” अशा विविध प्रतिक्रिया अभिनेत्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kushal badrike shares post about new year resolution netizens reacts sva 00