“तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर, अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना… तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमलायच्या वेदना… तू आहेस ना… तू आहेस ना…”, गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेलं ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटासाठी ‘तू आहेस ना’ हे गाणं किती समर्पक आहे. कारण महिलेशिवाय हे जीवनचं अपूर्णच आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. महिलांची थोरवी, महिलांची गोडवी गायली जात आहेत. पण हे या दिवसापुरते मर्यादितच न राहता सातत्याने केलं पाहिजे. कारण ‘ती’च्या शिवाय जे जीवन शून्य आहे. आज महिला दिनानिमित्ताने शितली म्हणून प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून बसलेली आणि आता लवकरच मीरा म्हणून भेटीस येणारी अभिनेत्री शिवानी बावकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधला.

मालिका, चित्रपट आणि अल्बम साँग या माध्यमातून अभिनेत्री शिवानी बावकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली आहे. तिची पहिलीच मालिका ‘लागीरं झालं जी’ सुपरहिट ठरली. या मालिकेतील तिच्या ‘शितली’ या भूमिकेचं आजही तितकंच कौतुक केलं जातं. अजूनही प्रेक्षकांच्या मनात शिवानीने साकारलेली शितली कायम आहे. २०१७ साली आलेली ‘लागीरं झालं जी’ या मालिकेनंतर शिवानीने बऱ्याच मालिका केल्या. ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’, ‘कुसुम’ आणि ‘लवंगी मिरची’ या मालिकांमध्ये शिवानी झळकली. पण तिच्या या मालिकांना फारसं यश मिळालं नाही. मात्र, आता नव्या जोमाने, उत्साहाने शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकायला ‘स्टार प्रवाह’च्या ‘साधी माणसं’ या मालिकेतून भेटीस येत आहे. मीरा हा नव्या भूमिकेत शिवानी पाहायला मिळणार आहे. अशी ही लोकप्रिय अभिनेत्री महिला दिन विषयी काय म्हणाली? व महिलांना काय मोलाचा सल्ला दिला? वाचा…

Sukh Mhanje Nakki Kay Asta
शालिनी करणार नित्याची हत्या? ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, “आता तरी..”
Tula Shikvin Changalach Dhada New Promo
भुवनेश्वरी की चारुलता? भर मांडवात अक्षरा लग्न थांबवणार;…
Bigg Boss 18 alice Kaushik is evicted from salman khan show
Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात घराबाहेर झालेल्या सदस्याचं नाव आलं समोर, टॉप-२मध्ये असण्याची ‘बिग बॉस’ने केली होती भविष्यवाणी
Appi Aamchi Collector
Video : “आता मी या आजाराला…”, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकही झाले भावुक; म्हणाले, “सिंबा तू…”
indrayani marathi serial
‘इंद्रायणी’ मालिकेत छोटी इंदू ‘त्या’ सीनसाठी ‘अशी’ झाली तयार; पाहा पडद्यामागील रिअल हिरोचा व्हिडीओ
Bigg Boss marathi fame Dhananjay Powar met Ankita Walawalkar boyfriend kunal baghat
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अंकिता वालावलकरला म्हणाला ‘हडळ’, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Reshma Shinde
“माझ्या माणसांचा हात धरून…”, रेश्मा शिंदेने शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांनी नवऱ्याबद्दल विचारले प्रश्न
Marathi Actress Hemal Ingle Bachelor Party
बॅचलर पार्टीसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीने गाठलं थायलंड! नुकतंच ‘या’ सुपरहिट चित्रपटात केलंय काम, तुम्ही ओळखलंत का?

शिवानीच्या दृष्टीकोनातून महिला दिन…

माझ्यासाठी महिला दिन म्हणजे जे काही विविध दिन साजरे केले जातात उदाहरणार्थ, मातृ दिन वगैरे त्या सर्व दिवसांचा हा एकत्रित असा दिवस आहे. कारण ‘ती’ जी आपल्या आयुष्यातली स्त्री असते ती या सगळ्या भूमिका निभावत असते. जेव्हा जशी गरज पडेल तशी ती खंबीरपणे उभीही असते.

मालिकाविश्वात वेतनावरून लिंगभेद केला जातो का? त्यावर तुझं मत काय?

मालिकाविश्वात असं केलं जात नाही, पण काही चित्रपट किंवा इतर क्षेत्रांमध्ये केला जातो. त्याच्यावर माझं असं काही मत नाहीये. चूक- बरोबर याविषयी मी बोलणार नाही. कारण आज महिला केंद्रीत बरंच काही यायला लागलंय. फक्त हे इतक्या उशीरा येतंय आणि आता याच्यावर बोलायला लागतंय, हीच एक खंत आहे. पण अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सिद्ध करून दाखवलंय की अभिनेत्याची गरज नसते. याचा अर्थ असा नाही की, अभिनेत्याची गरज नसावी. जसं आपल्या सामान्य आयुष्यात स्त्री आणि पुरुष असतो ते तसंच आपण दाखवावं. स्त्रियांना फक्त आयकँडी वापरलं जाऊ नये.

हेही वाचा – पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी

पडद्यामागच्या आणि पडद्यावरील महिला कलाकारांसाठी काही विशेष करणं गरजेचं आहे का?

आमचे वरिष्ठ सांगतात, आधी महिला कलाकारांसाठी काम करणं खूप अवघड होतं. पण आता सेटवर खूप काळजी घेतली जाते. पॅकअप उशीरा झालं तरी कोणीना कोणी सेटवर असतं, जे तुमची गाडी येईपर्यंत बाहेर थांबतं किंवा जर कुठे कोणाला सोडायचं असेल तर विचारपूस केली जाते. आता मी जी मालिका करतेय तिथल्या माझ्या दिग्दर्शकांसह मी अनेकदा त्यांच्या गाडीने घरी जाते. दिग्दर्शक अजय कुरणे सर ज्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका दिग्दर्शित केली होती, ते मला बऱ्याचदा लिफ्ट देतात. त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. अशी वडिलांप्रमाणे जपणारी माणसं आपल्याला भेटतात. आता शहरात किंवा शहराबाहेर चित्रीकरण करत असल्यामुळे थोडी सुरक्षेची चिंता वाटते. कारण आपल्या भारतात काय होतं आणि काय होऊ शकतं हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे काळजी घेतली जाते. त्याही व्यतिरिक्त मला असं वाटतं की, आपण आपली काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. कारण बाहेर जग बदलत नसेल तर नक्कीच आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, पॅकअप झाल्यानंतर आपल्या घरच्यांना आपलं लोकेशन शेअर करावं. वेळेत घरी जावं, असं मला वाटतं.

फोटो सौजन्य – शिवानी बावकर इन्टाग्राम

पुरुषप्रधान संस्कृतीत एखाद्या स्त्रीला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर…

पुरुषप्रधान संस्कृतीत स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर मनाशी असं आपण नाही ठरवायचं की, पुरुषाप्रमाणेच आपण मजबूत आहोत. कारण पुरुष आणि स्त्री वेगवेगळे आहेत. मार्शल आर्ट्स, कराटे हे सगळं आपण सुरक्षेच्या गोष्टी म्हणून शिकू शकतो. पण हे सगळ्यांसाठी शक्य होतं नाही. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असतात. त्यामुळे सिद्ध करण्याच्या मागे न पळता, जसं मी म्हणाले स्वतः सुरक्षित राहावं आणि आपल्या आजूबाजूंच्या लोकांना जेवढं होईल तेवढं विचारांतून थोडं जागृत करावं की, महिलांचा आदर कसा करावा? त्यांच्याशी कसं वागावं? जर स्वसंरक्षण प्रशिक्षण घेता आलं तर ती संधी सोडू नका. पेपर स्प्रे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्याजवळ ठेवा. आपल्याला वाटलं आपण असुरक्षित आहोत की, मग आपण दबले जातो आणि म्हणूनच पुरुषप्रधान संस्कृती प्रभावी ठरलेली असावी. पण आपण आपली थोडी काळजी घेतली पाहिजे. आजूबाजूच्या गोष्टी सुरक्षित ठेवल्या तर आपणही आपलं अस्तित्व खूप छान पद्धतीने निर्माण करू शकतो.

ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीच्या भूमिकेत पुन्हा का?

‘लागीर झालं जी’ नंतर मला बऱ्याच संधी आल्या. मी वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गावाकडची भूमिका मी लगेच नाही घेतली. ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ त्यात मी शहरातली एक मुलगी होते आणि त्यानंतर ‘कुसूम’मध्ये पण सगळं शहराकडचं होतं. परत मला वाटलं गावकडची भूमिका करावी त्यामुळे ‘लवंगी मिरची’ नावाची मालिका घेतली. आता परत ‘साधी माणसं’ या नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘स्टार प्रवाह’ चॅनेलबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची माझी वेळ आहे. त्यामुळे खूप उत्सुक आहे. मालिका नसताना मधल्या वेळेत मी प्रयत्न करत असते की, फोटोशूट करेन किंवा व्हिडीओ अल्बम साँग्ज करेन. मध्यंतरी मी एक चित्रपट केला तो प्रदर्शित होईल अशी माझी अपेक्षा आहे, मी त्यासाठीही थांबले आहे. कुटुंबाबरोबर सगळ्यात जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. योगा, चिंतन करते. थोडं जीवन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करते. आईला मदत वगैरे करण्याची सगळी काम करते. अशा ब्रेकनंतर मला छान वाटतं त्यामुळे मी दुसरी मालिका घ्यायला तयार असते.

जर्मनीत स्थायिक होण्याचं ठरवलं होतं पण…

मी जर्मन भाषा आवड म्हणून शिकले. पण जेव्हा मला या भाषेमुळे मिळणाऱ्या कामाच्या संधीबद्दल कळलं तेव्हा मी जर्मन भाषेत स्पेशलायझेशन केलं. जर्मन भाषातज्ज्ञ म्हणून नोकरीही केली. त्यानंतर मी जर्मनीत स्थायिक होण्याचा निश्चिय केला. पण माझ्या करिअरला वेगळंच वळणं मिळालं आणि मग मी अभिनय पूर्णवेळ छंद म्हणून जोपासला.

हेही वाचा – वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट

अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींनो…

तुम्ही आधी शिक्षण पूर्ण करा, त्यानंतर करिअरचा विचार करा. कारण जितकं सोप दिसतं तसं नसतं. आयुष्यात संयम अत्यंत महत्त्वाचा असतो.

महिला दिनानिमित्ताने महिलांना एक मोलाचा सल्ला…

आपल्यातील स्त्रीत्व कधीही सोडू नका. कारण, त्यामुळेच तुमचे सध्याचे अस्तित्व आहे. (Never leave your feminine side because that’s what makes you)