‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. २०१७ ते २०१९ या काळात ‘लागीरं झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राला भरभरून प्रेम मिळालं. अभिनेत्री विद्या सावळे यांनी या मालिकेत पुष्मा मामी ही भूमिका साकारली होती. ‘लागीरं…’नंतर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विद्या यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सन मराठी’ वाहिनीवर येत्या १८ मार्चपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव ‘कॉन्स्टेबल मंजू’ असून यामध्ये अभिनेत्री विद्या सावळे महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. याच मालिकेत विद्या यांच्याबरोबर त्यांच्या दोन जुळ्या मुली देखील झळकणार आहेत. विद्या यांनी फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे पोहोचला गोव्यात! आमिर खानच्या ‘दिल चाहता है’मधील ‘तो’ सीन केला रिक्रिएट

विद्या यांना नेहा आणि निकिता अशा दोन जुळ्या मुली आहेत. यापूर्वी त्यांची लेक नेहाने ‘कलर्स मराठी’च्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत काम केलं होतं. आता या मायलेकींना नव्या मालिकेत एकत्र झळकण्याची संधी मिळाली आहे. पोस्ट शेअर करत विद्या सावळे लिहितात, “तर पाहायला विसरू नका मम्मीसाहेब आणि सवी-कवी यांना ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेमध्ये १८ मार्चपासून… सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता. फक्त आणि फक्त “सनमराठी” वर!”

हेही वाचा : Video : भर कार्यक्रमात शाहरुख खानच्या पाया पडला अन्…; ‘जवान’ फेम अ‍ॅटलीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष; सर्वत्र होतंय कौतुक

दरम्यान, सन मराठी वाहिनीवर येत्या १८ मार्चपासून ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही नवीन मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. मालिका सुरू झाल्यावर या तिघींच्या भूमिकांबद्दल विस्तृत माहिती प्रेक्षंकासमोर येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lagira zala ji fame actress vidya sawale twin daughters entered in sun marathi new serial constable manju sva 00