Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding: ‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेली ‘लागिरं झालं जी’ मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत झळकलेला भैय्यासाहेब म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडचं नुकतंच लग्न झालं. किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधली. दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेता किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरचं लग्न १४ डिसेंबरला मालवणात झालं. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी आणि रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्नसोहळा दोघांचा झाला. या लग्नसोहळ्याला ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. अभिनेता नितीश चव्हाण, अमरनाथ खराडे, निखिल चव्हाण, सुमीत पुसावळे, महेश जाधव, राहूल मगदुम आणि पूर्वा शिंदे पाहायला मिळाले. या सर्व कलाकारांनी किरण-वैष्णवीच्या लग्नात धमाल केली. महेश, राहूल आणि पूर्वा यांचा बँन्जो वाजतानाच्या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा – ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती, म्हणाली…
अभिनेत्री पूर्वा शिंदेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर किरण-वैष्णवीच्या लग्नातील अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये किरण-वैष्णवीच्या सप्तपदीला महेश, राहूल आणि पूर्वा बँन्जो वाजताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
दरम्यान, बऱ्याच काळापासून किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांनी नातं लपवून ठेवलं होतं. २९ नोव्हेंबरला किरण-वैष्णवीने प्रेम जाहीर केलं. “ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’” असं कॅप्शन लिहित किरणने वैष्णवीबरोबर सुंदर फोटो शेअर केले. किरणच्या या पोस्टने चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता. तेव्हापासून किरण आणि वैष्णवीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर किरण गायकवाड सावंतवाडीचा जावई झाला आहे.
किरण गायकवाड आणि वैष्णवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd