‘लागिरं झालं जी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. ‘लागिरं झालं जी’मध्ये तिने साकारलेली शितल ही भूमिका बरीच गाजली होती. तिने या मालिकेत गावातल्या, धाडसी, बोलक्या पण वेळप्रसंगी तेवढ्याच खंबीर राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकादा ती अशाच एका भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरुन नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ‘लवंगी मिरची’ असं या मालिकेचं नाव असून अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत पुन्हा एकादा एका डॅशिंग मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीने इस्टाग्रामवर हा नवा प्रोमो शेअर करताना त्याला, “लवंगी मिरचीच्या वाकड्यात गेलं तर झटका लागल्याशिवाय राहणार नाही…” असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा-‘लागिरं झालं जी’ फेम शितलीचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

नव्या मालिकेच्या या प्रोमोमध्ये शिवानी फायटिंग करतानाही दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक मुलगी मसाल्याच्या दुकानात काहीतरी विकत घेताना दिसते. तर दोन मुलं तिला छेडताना दिसत आहेत. त्याचवेळी शिवानीची एंट्री होते आणि ती त्या मुलांची चांगलीच धुलाई करते. ही मुलं ज्या मुलीला छेडत असतात ती शिवानीची बहीण असते. नंतर ती आपल्या बहिणीबरोबर निघून जाते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

आणखी वाचा- शिवानी बावकरला मिळाली शरद पवारांकडून कौतुकाची थाप, म्हणाली “तो दिवस…”

दरम्यान शिवानी बावकरच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने ‘लागिरं झालं जी’ मालिकेतून मराठी कलासृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती सोनी मराठीवरील ‘कुसुम’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय अभिनेता अजिंक्य राऊतबरोबर ‘नाते नव्याने’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. याशिवाय ती ‘गुल्हर’ या मराठी चित्रपटातही दिसली होती आणि आता ती लवकरच ‘लवंगी मिरची’ या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lagira zhal jee fame shivani baokar new serial lavangi mirchi watch promo mrj