“लय असत्याल मनमौजी, लाखात एक माझा फौजी…” हा डायलॉग ऐकल्यावर चटकन डोळ्यासमोर येते ‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘लागिरं झालं जी’. २०१७मध्ये आलेल्या ‘लागिरं झालं जी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर दोन वर्ष अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील अज्या आणि शितलीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं. भैय्यासाहेब, विक्या, राहुल्या, जमीर, जयडी, जीजी, विक्रम या पात्रांना खूप लोकप्रियता मिळाली. अजूनही ‘लागिरं झालं जी’ मालिका तितक्याच आवडीने पाहिली जाते. तसंच मालिकेचं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या ओठांवर असतं. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकार आता वेगवेगळ्या मालिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. लवकरच जुनी जयडीदेखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘लागिरं झालं जी’ मालिकेतील जयडी म्हणजे जयश्री हे पात्र दोन अभिनेत्रीने साकारलं होतं. सुरुवातीला अभिनेत्री किरण ढाणेने जयश्री पात्र साकारून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री हा ‘झी मराठी’चा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर काही काळाने किरण ढाणेची मालिकेतून एक्झिट झाली. तिची जागी अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने घेतली. सध्या पूर्वा ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत पाहायला मिळत आहे. पण, आता किरण ढाणे देखील लवकरच ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे.

हेही वाचा – सरकार-सानिकाच्या प्रेमावर पंकजा आणणार ‘संक्रांत’ तर पिंगा गर्ल्स बुलबुल बाग वाचवण्यासाठी…; एक तासाच्या विशेष भागात काय घडणार? वाचा…

‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर १० जानेवारीला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘उदे गं अंबे’ या मालिकेचा हा व्हिडीओ आहे. मालिकेत यल्लमा देवीची एन्ट्री होणार आहे. पण ही यल्लमा देवी कोण असेल? असं लिहित ‘स्टार प्रवाह’ने व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये यल्लमा देवीची झलक पाहायला मिळत आहे. पण, चेहरा पूर्णपणे दाखवला नाहीये. त्यामुळे नेटकरी बऱ्याच अभिनेत्रीची नाव प्रतिक्रियेद्वारे सांगत आहेत. पण, ‘उदे गं अंबे’ या मालिकेत यल्लमा देवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून किरण ढाणे आहे.

हेही वाचा – लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा – Video: ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतील कलाकारांनी निवेदिता सराफांना वाढदिवसानिमित्ताने दिलं खास सरप्राइज, पाहा व्हिडीओ

‘लागिरं झालं जी’ मालिकेनंतर किरण ढाणे काही मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली होती. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘एक होती राजकन्या’ मालिकेत किरण प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती ‘पळशीची पीटी’ या चित्रपटात झळकली. गेल्या वर्षी तिचा ‘डिअर लव्ह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता किरण ढाणे ‘उदे गं अंबे’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. पाच वर्षांनंतर किरणला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Story img Loader