गेल्या काही महिन्यांपासून छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून नेहमीच नवनवीन ट्विस्ट आणले जातात. तसेच अनेकदा काही नव्या कलाकारांची मालिकेमध्ये एन्ट्री झाल्याचं आपण पाहिलंय. ‘झी मराठी’च्या अशाच एका नव्या मालिकेत लवकरच एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. हा अभिनेता कोण आहे जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्च महिन्यात ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेचं कथानक सध्या रंजक वळणावर आहे. लवकरच मालिकेत वसुंधराचा पहिला नवरा शार्दूलची एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा : मोठा चष्मा, वयस्कर लूक अन्…; ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? चित्रपटसृष्टीत २० वर्षे गाजवतेय अधिराज्य

आता मालिकेत वसुच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका कोण साकारणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मालिकेच्या नवीन आलेल्या प्रोमोमुळे मालिकेत शार्दूलची भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट झालं आहे. ‘मराठी टीव्ही इन्फो’ या मराठी टेलिव्हिजन विश्वातील अपडेट देणाऱ्या इन्स्टाग्राम पेजवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : OTT Releases : घरबसल्या पाहता येणार ‘हे’ १० चित्रपट अन् वेबसीरिज; अजय देवगणच्या थरारक चित्रपटाचा समावेश, वाचा यादी

राया उर्फ सिद्धेश प्रभाकर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या नुकत्याच चालू झालेल्या मालिकेत एन्ट्री घेणार आहे. या मालिकेत सिद्धेश वसुंधराचा पहिला नवरा शार्दूलची भूमिका साकारेल. आता शार्दूलची एन्ट्री झाल्यावर वसुंधरा-आकाशच्या नात्यात काय ट्विस्ट येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिली झलक शेअर करत म्हणाला, “इतकं भारावून जाणं…”

सिद्धेश प्रभाकरबद्दल सांगायचं झालं, तर त्याने ‘लग्नाची बेडी’ मालिकेत राया रत्नपारखी ही भूमिका साकारली होती. आता शार्दूलची एन्ट्री केव्हा होणार? तो आल्यावर बनी त्याचा मुलगा आहे हे शार्दूलला कळणार का? याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागांमध्ये करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…

दरम्यान, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकरसह वंदना सरदेसाई, पंकज चेंबूरकर, सुदेश म्हाशीलकर आणि रेयांश जुवाटकर हे कलाकार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lagnachi bedi fame actor siddhesh prabhakar entry in zee marathi punha kartavya aahe sva 00