‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत सध्या नवीन वळण आले आहे. सूर्याची काकी अनेक वर्षांनंतर पुन्हा घरी परतली आहे. तिला अचानक आल्याचे पाहिल्यानंतर सूर्याचा संताप अनावर झाला होता. सूर्याने रागाच्या भरात या पुष्पाकाकीला पुन्हा घराबाहेर जाण्यास सांगितले. पुष्पाकाकीने रडत रडत चूक झाली, असे म्हणत त्याची माफी मागितली. आता ही काकी सूर्याच्या आयुष्यात नवीन संकट आणणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

जगतापांच्या नावावर लिहून दिलेलं बारा वतनांचं पत्र…

लाखात एक आमचा दादा या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पुष्पाकाकी व डॅडी यांच्यात संवाद सुरू आहे. डॅडी सूर्याच्या काकीला म्हणतात, “वाह, वाह, वाह, डायरेक्ट अस्थिकलश घेऊन एन्ट्री! आपल्याला एन्ट्री आवडलीय. जगतापांच्या नावावर लिहून दिलेलं बारा वतनांचं पत्र, दस्तऐवज आम्हाला आणून द्यायचा. त्यावर पुष्पाकाकी म्हणते, एवढंच ना? का अजून काय पाहिजे? त्यावर डॅडी म्हणतात, “लिंगोबा, बारा वतनांचा लिंगोबा. एक आठवड्याच्या आता या दोन वस्तू मला आणून दिल्या नाहीस, तर तुझ्या नवऱ्याच्या खऱ्याखुऱ्या अस्थींचं विसर्जन तुला कृष्णेत करावं लागेल.”

हा प्रोमो शेअर करताना, “डॅडी खेळणार त्यांची नवी चाल…!”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे नुकतीच पुष्पाकाकी सूर्याच्या कुटुंबात पुन्हा एकदा आली आहे. अनेक वर्षे न परतल्याबद्दल तिने सूर्याची माफी मागितली. आता सूर्याची काकी व डॅडी एकत्र मिळून सूर्याविरुद्ध कट करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. डॅडींकडे आता जी संपत्ती आहे, ती सूर्याची आहे. त्याचे पेपर काही दिवसांपूर्वी तुळजाच्या हाती लागले होते. मात्र, सूर्यासमोर हे सत्य आणेपर्यंत डॅडींनी ते पेपर गायब केले. सूर्याचा डॅडींवर खूप विश्वास आहे. ते त्याला देवासारखे वाटतात. ते कोणतीच गोष्ट कधीही चुकीची करू शकत नाहीत, असे त्याला वाटते. कोणीही त्यांच्याबद्दल जर चुकीचे बोलले, तर तो ते ऐकून घेत नाही. तुळजाने अनेकदा डॅडींचा खरा चेहरा त्याच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून सूर्या व तुळजा यांच्यामध्ये गैरसमजही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. आता डॅडी पुष्पाकाकीच्या मदतीने काय करणार, तुळजा किंवा सूर्याला याबद्दल समजणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader