‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या सहज अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मग तो सूर्या असो, तुळजा, डॅडी, धनश्री, राजश्री, भाग्या, तात्या, शत्रू किंवा तेजश्री असो; सर्वच जण त्यांच्या भूमिका उत्तमरीत्या साकारताना दिसतात. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे साधे राहणीमान व सामान्यांसारखेच त्यांच्या आयुष्यातील प्रश्न यांमुळे या मालिकेतील पात्रे सर्वांना जवळची वाटतात. हे कलाकार अनेकदा समाजमाध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता मालिकेत तेजश्रीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कोमल मोरे (Komal More) हिने समाजमाध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
कोमल मोरेने समाजमाध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर मालिकेतील सहकलाकार अतुल कुडाळे दिसत आहे. अतुल कुडाळेने लाखात एक आमचा दादा या मालिकेत शत्रूची भूमिका साकारली आहे. कोमल व अतुलने ‘हाय हुक्कू, हाय हूक्कू’ या गाण्यावर एक व्हिडीओ बनवला आहे. त्यामध्ये एका क्षणी अतुल कोमलला फूल देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने अतुल कुडाळे व ‘लाखात एक आमचा दादा’च्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे.
नेटकरी काय म्हणाले?
कोमल व अतुलच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यातील एका कमेंटवर अभिनेत्रीने रिप्लाय दिला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करीत, “तेजू, तू शत्रूला पोत्यात भरून मार”, असे लिहीत पुढे हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. त्यावर कोमल मोरेनेही “लवकरच”, असे म्हणत हसण्याची इमोजी शेअर केली आहे. इतर अनेकांनीदेखील कमेंट करीत मालिकेतील ही जोडी आवडत असल्याचे म्हटले आहे. “आम्हाला ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये तुमचं प्रेम पाहायचं आहे; भांडण नको”, “येतील १००, जातील १००, तेजूदीदी आणि शत्रूशेठची जोडी एक नंबर”, “मला तर तुमची जोडी खूप आवडते”, “शत्रू तू बेस्ट आहेस”, तसेच अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे दिसत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे शत्रू व तेजूचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. शत्रूला तेजूशी लग्न करायचे होते म्हणून डॅडींनी मोठा कट रचला होता. त्यांचा हा प्लॅन यशस्वीदेखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, लग्नानंतर शत्रू तेजूला त्रास देत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी सूर्याची पुष्पाकाकी अनेक वर्षांनंतर घरी परतली आहे. तिला डॅडींनी खास काम सांगितले आहे. आता डॅडींचा हा प्लॅन यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd