‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांनी मने जिंकून घेतली आहेत. सूर्या, तुळजा, भाग्यश्री, तेजश्री, राजश्री, धनश्री, सूर्याचे मित्र काजू व पुड्या, डॅडी, शत्रू आणि इतर पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. हे कलाकार मालिकेतून प्रेक्षकांचे जितके मनोरंजन करतात, तितकेच ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील मनोरंजन करताना दिसतात. आता मालिकेत भाग्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई तनपुरे व काजूची भूमिका साकारणारा महेश जाधव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांना जिंकून घेताना दिसत आहे.
आमचा मावळा मर्द गडी
जुई तनपुरे व महेश जाधव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जुई व महेश यांनी कोंबडी पळाली या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. डान्स करताना त्यांच्या एनर्जी व डान्स स्टेप यांमुळे या दोन कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. त्यांच्यातील उत्साह पाहणाऱ्यांवर छाप पाडणारा आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जुईने ‘आमचा मावळा मर्द गडी’, अशी कॅप्शन दिली आहे. आता त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांनी जुई व महेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने, “वाह! झकास”, असे म्हणत कौतुक केले आहे, तसेच हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “एकदम झकास.” दुसऱ्या नेटकऱ्याने, “कडक दादा डान्स”, असे म्हणत कौतुक केले. अनेक नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत जुईने भाग्याची भूमिका साकारली आहे. सूर्याची सर्वांत धाकटी बहीण म्हणजे भाग्या आहे. लहान असूनही दादाची काळजी घेणारी, त्याच्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारी, त्याचे चांगले व्हावे यासाठी सतत प्रयत्न करणारी अशी ही भाग्या आहे. सध्या भाग्यावर संकट आल्याचे मालिकेत दिसत आहे. तिच्या शाळेतील एक मुलगा तिला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रोजेक्ट स्पर्धेसाठी गेल्यावर त्याने तिचा एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. आता सूर्याला हे समजणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या मालिकेत अभिनेता महेश जाधवने काजू ही भूमिका साकारली आहे. सूर्याचा खूप जवळचा मित्र, त्याच्या मदतीसाठी कायम पुढे असणारा, अशी त्याची भूमिका आहे.
हेही वाचा : Bigg Boss 18: रजत दलालच्या चुकीमुळे ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
आता मालिकेत पुढे काय होणार, तुळजा सूर्यासमोर डॅडींचा खरा चेहरा आणू शकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.