‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे. या मलिकेतील कलाकारांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायला फार आवडतं. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील एक कलाकार सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने खरेदी केलेली नवीकोरी कार आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील जिमसीना म्हणजेच अभिनेता शुभम पाटील (Shubham Patil New Car) याने नवीन कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट केली आहे. शुभमने त्याच्या कारचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत. शुभमने त्याच्या वाढदिवसानिमित्त नवीन कार घेतली आहे. नवीन कार घेतल्यावर शुभम सांगलीतील गणपती मंदिरात गेला होता. तिथे काढलेले काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शुभम फोटोमध्ये निळी जीन्स व पांढरा टी शर्ट घालून दिसतोय. त्याने स्वतःच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून १३ लाख किमतीची ह्युंदाई क्रेटा ही गाडी खरेदी केली आहे. शुभम पाटील हा मूळचा सांगलीचा आहे. नवीन गाडी घेतल्यावर त्याने सांगलीतील गणपती मंदिरात दर्शन घेतले. “नवीन गाडी… गणराया सदैव तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे..”, असं कॅप्शन शुभमने या फोटोंना दिलं आहे.

पाहा पोस्ट

शुभम पाटीलने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यावर चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. नवीन गाडीसाठी चाहत्यांनी कमेंट्स करून त्याला शुभेच्छा दिल्या. तर अनेक सांगलीकरांनी माहीत असतं तर तुला भेटायला आलो असतो, असंही म्हटलं आहे. काही चाहत्यांनी शुभमच्या या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट्स केले आहेत.

दरम्यान, शुभम पाटीलच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो झी मराठीच्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतही झळकला होता. त्याने म्युझिक व्हिडीओदेखील केले आहेत. शुभमला फिटनेसची खूप आवड आहे. तो त्याचे वर्कआउट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत असतो. तसेच तो कामाबद्दल व वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.

Story img Loader