‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मालिकेत नवीन वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. तुळजाच्या वडिलांनी रागात तिचे आणि सूर्याचे लग्न लावले होते. त्यांचा त्या दोघांवर राग होता. मात्र, मालिकेत सध्या डॅडी बदलले असून ते चांगले वागत असल्याचे दिसत आहे. डॅडींचा तुळजा आणि सूर्यावरचा राग गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी सूर्याच्या संपूर्ण कुटुंबाला घरी जेवायला बोलवत त्यांचे योग्य आदरातिथ्य केल्याचे पाहायला मिळाले. भांगेच्या गोळ्या असलेले जेवण डॅडी आणि सूर्या यांनी खाल्ल्याने अनेक गमतीजमतीदेखील झाल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

तुळजाला ‘त्या’ युक्तीसाठी डॅडींकडून शाबासकीची थाप मिळणार

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, डॅडी सूर्याच्या घरात आले आहेत. सूर्याच्या घरात देवाचं दागिनं आलं, अशी घोषणा करण्यात येते. चला आता जोडीनं पूजेला बसा बघू, असे म्हटल्यानंतर सूर्या आणि तुळजा पूजेला बसतात. तोपर्यंत तुळजाचा भाऊ शत्रू सूर्याच्या घराबाहेर येतो. तो सूर्याला उद्देशून स्वत:शीच म्हणतो, तुझा सगळा मान काढतो का नाही बघ. त्यानंतर तो कोणालातरी फोन करतो आणि लाइट कट कर असे सांगतो. अचानक लाइट गेल्याने सगळे गोंधळतात. गावातील एक माणूस म्हणतो, डॅडी तुमच्या घरी पूजा करू. मुहूर्ताची वेळ निघून गेली तर देवीचा कोप व्हायचा. तितक्यात तुळजा सूर्याच्या बहिणींना बोलावते आणि त्यांना काहीतरी सांगते. सूर्याच्या बहिणी पणत्या घेऊन येतात. घर प्रकाशाने उजळून निघते. डॅडी म्हणतात, वाह वाह, शाबास, ही खरी दिवाळी. पूजेला सुरुवात होते.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
tula shikvin changalach dhada zee marathi serial bhuvaneshwari re enters in the show
प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
झी मराठी इन्स्टाग्राम

हेही वाचा: होणाऱ्या नवऱ्यासह धनंजय पोवारच्या घरी पोहोचली अंकिता! लाडक्या डीपी दादांना केली भाऊबीज; फोटो आले समोर

हा प्रोमो शेअर करताना, झी मराठीने, “शत्रूचा प्लॅन फसणार, घर दिव्यांनी उजळून निघणार…”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे तुळजाचे सूर्याबरोबरचे लग्न हे तिच्या मर्जीविरुद्ध झाले होते. मात्र, आता त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे झी मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये पाहायला मिळाले होते. दरम्यान, शत्रू त्याचा प्लॅन फसल्यावर काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader