सूर्या व त्याच्या बहि‍णींचे नाते हे प्रेक्षकांना भारावून टाकते. त्यांच्यातील प्रेम, एकमेकांबद्दल वाटणारी काळजी, आपल्यामुळे आपल्या इतर भावंडांना त्रास होऊ नये यासाठी केले जाणारे प्रयत्न यांमुळे या भाऊ-बहि‍णींचे नाते कायमच प्रेक्षकांना जवळचे वाटते. ‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेतील ही भावंडे कायम एकमेकांच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांच्यावर कोणते संकट येऊ नये, यासाठी ती सतत प्रयत्न करताना दिसतात. आता या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूर्या भाग्याला त्रास देणाऱ्या मुलाला शिक्षा देणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सूर्या भाग्याला त्रास देणाऱ्या मुलाला ओढत घेऊन वर्गात येतो. सूर्या अत्यंत रागात असल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. वर्गातील सर्व मुला-मुलींसमोर त्याचे कपडे काढतो. सूर्या म्हणतो, “या पोरांना मुलगी शिकली, मुलगी जिंकली की, त्याचा त्रास होतो. त्यांच्या आतल्या पुरुषाला शांत बसू देत नाही. मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते, हे कळलं पाहिजे. यांच्या नांग्या वेळीच नाही ना ठेचल्या, तर मुलींचं बाहेर पडणं अवघड होऊन बसेल आणि ते मी होऊ देणार नाही. तो मुलगा सूर्याच्या पाया पडत, रडत रडत म्हणतो, “इथून पुढे मी कुठल्याच मुलीला त्रास देणार नाही”, सूर्या त्याला व इतर मुलांना उद्देशून त्याच संतापाने म्हणतो, “इथून पुढे गावातील कुठल्याच पोरीला पोरानं छेडण्याचा प्रयत्न केला ना, तर त्याची गाठ माझ्याशी आहे.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्यादादा इंगा दाखवणार..!, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सूर्याची पाठ थोपटली आहे. अनेकांनी कमेंट्स करत सूर्याचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. “खूप छान सूर्यादादा, भाग्यश्रीने न घाबरता त्या पोराला पोलिस अधिकारी यांच्याकडे द्यायला पाहिजे होते”, “वाह! आता झाला ना न्याय”, “वा! जबरदस्त दादा, लवकरच राजच्या रूपात शत्रुघ्न आणि जालिंदरला पाहायला आवडेल”, असे म्हणत सूर्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी भाग्या शाळेतून इतर शाळेतील मुला-मुलींसह प्रोजेक्टच्या स्पर्धेसाठी पुण्याला गेली होती. त्यावेळी तिच्या वर्गातील एका मुलाने तिचा व्हिडीओ काढला होता. हे पुण्याहून परत गावी गेल्यानंतर भाग्याला समजले. तिच्या शाळेतील शिक्षकांनादेखील याबद्दल माहीत झाले. त्यांनी त्याबाबत डॅडींना सांगितले. डॅडींनी तो मोबाईल त्यांच्याकडे ठेवून घेतला. मात्र, त्या मुलाला कोणतीही शिक्षा दिली नाही. भाग्याने ही गोष्ट घरातील कोणालाही सांगितली नाही. मात्र, त्या व्हिडीओमुळे ती सतत चिंतेत असल्याचे दिसत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek aamcha dada new promo surya will punish boy who harasses his sister netizens praised nsp