‘लाखात एका आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेत सतत ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. आता मालिकेत तेजूचे लग्न तुळजाचा भाऊ शत्रूबरोबर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तेजूने तिच्या घराच्या सुखासाठी शत्रूबरोबर लग्न केले. शत्रूला सुरुवातीपासूनच तेजूबरोबर लग्न करायचे होते. शत्रूची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुळजाच्या लग्नात झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी डॅडींनी एक प्लॅन केला आणि तो प्लॅन यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. तुळजाने शत्रू चांगली व्यक्ती नाही आणि त्यामुळे तू त्याच्याबरोबर लग्न करू नकोस, असे सांगूनही तेजूने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

काय म्हणाली तुळजा?

लाखात एक आमचा दादा या मालिकेचा नवीन प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, शत्रू, सूर्या, डॅडी, छत्री हे सगळे एकत्र आहेत. त्यावेळी छत्री सूर्याला म्हणतो, तेजूचं लग्न तुझ्या फायद्याचं ठरलं बर का, शत्रूभय्यांसाठी कुठे काय खर्च करावा लागला? त्यानंतर डॅडी सूर्याला म्हणतात, “जावईबापू आम्हाला काहीच अपेक्षा नाहीत. तुम्हालाच काही प्रेमाने करायचे असेल, तर आम्ही काही अडवणार नाही.” त्यावर सूर्या म्हणतो, “मला जसं जमेल तसं ते मी नक्की करेन.” तेवढ्यात तुळजा येते आणि ती डॅडींना म्हणते, “डॅडी, शत्रू जसा आमचा जावई, तसा सूर्या तुमचा जावई. शत्रूचा मानपान करावा, अशी तुमची इच्छा आहे. तसाच सूर्याचाही मानपान तुम्ही केला पाहिजे.”

Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “डॅडी करतील का सूर्याचा मानपान, देतील का त्याला जावयाचा मान…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

लाखात एक आमचा दादा मालिकेत सूर्या व तुळजाचे लग्न हे अचानक तुळजाच्या मर्जीविरुद्ध झाले होते. सूर्याला जरी तुळजा आधीपासून आवडत असली तरी त्यांचे अचानक लग्न होण्याची त्यालासुद्धा अपेक्षा नव्हती. लग्नानंतर तुळजा सूर्याच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले. तुळजा तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न करण्यासाठी तिच्या लग्नातून सूर्याच्या मदतीने पळून गेली होती. मात्र, तो ठरलेल्या ठिकाणी न आल्यामुळे ती सूर्याबरोबर परत आली. अपमान झाल्यामुळे चिडलेल्या डॅडींनी तिचे लग्न सूर्याबरोबर लावून दिले. त्यानंतर डॅडी व त्यांचे कुटुंब सूर्याबरोबर बोलत नव्हते. मात्र, काही दिवसांपासून डॅडी सूर्याशी चांगले वागण्याचे नाटक करीत आहेत. त्यांनीच समीर निकम ऊर्फ पिंट्याचे स्थळ तेजूसाठी आणले आणि सूर्याचा विश्वासघात करत अशी परिस्थिती निर्माण केली की, ज्यामुळे तेजूचे लग्न सूर्याबरोबर झाले.

हेही वाचा: प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”

आता डॅडींचा पुढचा प्लॅन काय असणार आहे, तुळजाच्या म्हणण्याप्रमाणे डॅडी सूर्याला जावयाचा मान देणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader