‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेतील सूर्या दादा व त्याचे साधे कुटुंब प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते. तेजू, शत्रू, भाग्यश्री, धनश्री, राजश्री, तुळजा, डॅडी अशा सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत सतत येणाऱ्या नवीन वळणामुळे प्रेक्षकांच्या मनात आता पुढील भागात काय होणार, ही उत्सुकता निर्माण झालेली दिसते. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असून सूर्याला त्याच्या वाढदिवशीच पोलिस अटक करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढदिवशीच पोलीस सूर्याला अटक करणार

लाखात एक आमचा दादा मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, गावकरी डॅडींच्या बंगल्यासमोर आले आहेत. बाहेरचा गोंधळ ऐकून डॅडी बाहेर येतात. गावकऱ्यांच्या हातात त्यांची मुले असून ते म्हणतात, ‘आमच्या मुलांना वाचवा डॅडी, उलट्या करतात आणि यांना जुलाबसुद्धा होतात.” डॅडी त्यांना विचारतात हे सगळं कसं झालं. तिथे उभा असलेला एक माणूस म्हणतो, शाळेच्या जेवणानं झालंय डॅडी. शाळेत जेवण पोहोचवणारा कोण होता? तर सूर्या असा आवाज गर्दीतून ऐकायला येतो. दुसरीकडे सूर्याच्या घरात त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. घरातील सर्व जण आनंदात असल्याचे दिसत आहे. डॅडी छत्रीला सांगतात, “गावात जाऊन बातमी पसरव, सूर्याने शाळेतील मुलांच्या जीवाशी खेळ केला. सूर्याच्या घरात सगळे जण आनंदाने मजा-मस्ती करत असतानाच पोलिस येतात व म्हणतात, “थांबवा हे. तुझ्यावर घातपाताचा आरोप आहे व त्याच्या हातात बेड्या घालून घेऊन जातात.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आनंदाच्या क्षणी पोलिस धडकणार सूर्याच्या घरी…!

मालिकेत दाखविल्याप्रमाणे तुळजाचे वडील डॅडी हे सूर्यासमोर चांगले वागण्याचे नाटक करतात. पण, त्याच्या पाठीमागे कट कटकारस्थान करून सूर्याला अडचणीत आणतात. त्याला त्रास देतात. इतकेच नव्हे, त्यांची प्रॉपर्टी आहे असे ते दाखवतात, ती जमीनसुद्धा सूर्याची आहे. काही दिवसांपूर्वीच तुळजाला ही गोष्ट माहीत झाली आहे. डॅडींचा खरा चेहरा तुळजाला माहीत असून तिने त्यांना चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: “किसिंग सीनच्या वेळी तो खूप…”, अभिनेत्रीने सांगितला आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली, “जितकी मी…”

आता तुळजा सूर्याची निर्दोष मुक्तता करू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.