कुटुंबातील एकोपा, एकमेकांविषयी वाटणारी काळजी, प्रेम यांमुळे घरात कायम आनंदाचे वातावरण असते. चित्रपट, मालिकांमधूनसुद्धा अशी काही कुटुंबं प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या लाखात एक आमचा दादा (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेतील सूर्याचे कुटुंबदेखील असेच काहीसे दिसते. जिथे सूर्या त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सांभाळताना दिसतो. चार बहिणी, वडील व पत्नीला कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू नये यासाठी तो प्रयत्न करताना दिसतो. सूर्याचे जितके त्याच्या कुटुंबावर प्रेम आहे, तितकेच त्याच्या बहि‍णी, वडील व तुळजा या सर्वांचेही त्याच्यावर प्रेम आहे. आता हे कुटुंब एका स्पर्धेत सहभागी होणार आहे, जिथे सूर्या व डॅडी समोरासमोर येणार असल्याचे मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला गावात ‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली जाते. सूर्या एक माहितीपत्रक तुळजा व त्याच्या तीन बहि‍णींना दाखवत म्हणतो, “गावात ‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धा भरणार आहे हे बघा. जिंकण्यासाठी नाही, आनंद घेण्यासाठी खेळायचं आणि असंही आपलं कुटुंब भारी आहेच. घ्यायचा ना भाग?” दुसरीकडे डॅडी त्यांच्या घरातील सर्वांना सांगतात, “आपलं कुटुंब सर्वोत्कृष्ट कुटुंब ठरलं पाहिजे. निंबाळकर घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे. जिंकण्यासाठीच खेळायचं.” हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ” ‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धेत कोण पटकावणार विजेत्याचा मान…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

Paaru And Lakshami Niwas
आदित्य-अनुष्काचा साखरपुडा होणार की जयंत-जान्हवीचे लग्न? एकाच पॅलेसवरून अहिल्यादेवी किर्लोस्कर व जयंत यांच्यात होणार वाद…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
nikki tamboli and usha nadkarni will visit maharashtrachi hasya jatra
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पोहोचल्या निक्की तांबोळी अन् उषा नाडकर्णी! कोकणातील पारंपरिक गाण्यावर धरला ठेका, पाहा प्रोमो
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Land prices increase as celebrities are attracted to Alibaug for investment
तारांकितांना गुंतवणुकीसाठी अलिबागची भुरळ, जमिनींचे भाव गगनाला
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…

मालिकेत दाखविल्याप्रमाणे तुळजाचे वडील म्हणजेच डॅडी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहेत. डॅडी गावातील लोकांसमोर चांगले वागण्याचे, लोकांना मदत करण्याचे नाटक करतात. ते सूर्याला प्रत्येक वेळी मदत करण्याचे नाटक करतात. परंतु, प्रत्यक्षात मात्र ते त्यांचे शोषण करतात. आता त्यांच्याकडे जी संपत्ती, जमीन आहे, ती खरे तर सूर्याची आहे; पण सूर्याला याबद्दल कोणतीही कल्पना नाही. सूर्याला डॅडी म्हणजे देवासमान वाटतात. तो त्यांच्या शब्दासाठी काहीही करायला तयार होतो. तुळजाला डॅडींच्या खऱ्या चेहऱ्याची, ते सूर्याची फसवणूक करतात, याबद्दल माहीत आहे. मात्र, पुरावे नसल्याने ती सूर्यासमोर काहीही सिद्ध करू शकत नाही.

आता ‘लाखात एक आमचा…’ मालिकेत, कोणते कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader