‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेत डॅडी सूर्याविरुद्ध काही ना काही कटकारस्थान करताना दिसतात. सूर्या मात्र त्यांना देव मानतो. त्यांच्यासाठी काहीही करतो. त्यांच्या प्रत्येक शब्दाला तो महत्त्व देतो. डॅडींची मुलगी व सूर्याची पत्नी तुळजाला मात्र डॅडींचा खरा चेहरा माहीत आहे. डॅडी सूर्याच्या भोळेपणाचा, त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत असल्याचे तुळजाला माहीत आहे. त्यावरून तुळजा व डॅडी यांच्यामध्ये अनेकदा वादही झाले आहेत. त्यांचा खरा चेहरा सूर्यासमोर आणण्याचा तुळजाने निर्धार घेतला आहे. तिने तसे डॅडींना चॅलेंज दिले आहे. आता या मालिकेचा एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे.

सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का?

झी मराठी वाहिनीने लाखात एक आमचा दादा या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते, “तुळजा भाग्याच्या शाळेत आली आहे. तेथील एक मुलगा तिला उद्धटपणे बोलतो. तो तुळजाला म्हणतो, “ए पुढं बघून चाल ना, का डोळे गेले?” तुळजा त्याला म्हणते, मोठ्यांशी कसं बोलायचं कळत नाही का तुला? पुढे प्रोमोमध्ये दिसते की शाळेतील एक शिक्षक तुळजाला म्हणताता, “त्या दिवशी शाळेत विषबाधा झाली ना, त्यामागे नक्की कोणाचा तरी हात आहे. तुळजा त्यांना विचारते की कोणाचा? ते शिक्षक ते सीसीटीव्हीमध्ये… असं काहीतरी सांगत असतात. तितक्यात एक शिक्षिका त्यांना बोलावतात. तुळजा स्वत:शीच म्हणते, “आता ही सीसीटीव्हीच मला त्या माणसापर्यंत पोहोचवेल.” पुढे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सत्यजितचा भाऊ भाग्याच्या शाळेत आला आहे. मुलांचे प्रोजेक्ट चालू आहेत, तिथे तो आला असून, तो भाग्याजवळ येतो व म्हणतो, तुझ्या बापाने बनवून दिलाय प्रोजेक्ट की तुझ्या लाडक्या भावाने? तितक्यात सूर्या तिथे येतो आणि म्हणतो, “काय ओ लहान मुलीशी कसं बोलावं, हे माहीत नाही का तुम्हाला? खरं तर भाग्याची परीक्षा घेण्याची तुमची पात्रता नाही.

Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
Paaru
Video: “माझ्या रूममध्ये त्या दिवशी…”, प्रितमच्या खुलाशानंतर आदित्य अनुष्काला जाब विचारणार; ‘पारू’ मालिकेत नेमकं काय घडणार?

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “तुळजाला सीसीटीव्हीमध्ये दिसेल का त्या व्यक्तीचा चेहरा..?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे सूर्याची बहीण राजश्री शाळेत जेवण पोहोचवते. एक दिवस गावातील मुलांना या जेवणाने विषबाधा झाली. ती राजश्रीने दिलेल्या जेवणामुळे झाली. त्यामुळे गावकरी चिडले आणि ते सूर्यावर नाराज झाले. सूर्याच्या घरी पोलिस आले. सूर्याने ते जेवण त्याने पोहोचवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले. त्याला मोठ्या प्रमाणात मारल्याचेही दाखवले. खरे तर हा सगळा प्लॅन डॅडी व शत्रूचा होता. सूर्याला पोलिसांनी पकडल्यामुळे ते खूश होते. मात्र, जेव्हा शत्रूच्या लक्षात आले की, तो शाळेतील सीसीटीव्ही बंद करायचे विसरला आहे, तेव्हा त्यांनी सूर्याला ५० हजारांचा जामीन भरून बाहेर काढले. त्यामुळे सूर्याच्या मनात डॅडींविषयीचा आदर आणखी वाढला.

हेही वाचा: Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने नवीन वर्षाचे ‘असे’ केले स्वागत; रामशेज किल्ल्यावरून पतीसह दिल्या शुभेच्छा

आता मालिकेत पुढे काय होणार, तुळजा सत्य शोधू शकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader