‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada)मधील तेजू, भाग्यश्री, राजश्री, धनश्री व सूर्यादादा या बहिणी-भावांमधील प्रेम हे प्रेक्षकांना भारावून टाकते. आईने घर सोडल्यानंतर वडील दारूच्या आहारी गेले. परिणामी या चार बहि‍णींची जबाबदारी सूर्यावर आली. सूर्यानेदेखील त्याच्या बहि‍णींचा प्रेमाने सांभाळ केला. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. त्यांना प्रेमाने वाढवले. बहि‍णींनादेखील त्यांच्या सूर्यादादाचा अभिमान आहे. प्रेमाबरोबरच त्याच्याप्रति आदरदेखील आहे. त्यामुळे या बहिणी-भावामधील बॉण्डिंग प्रेक्षकांना आवडते. त्याबरोबरच सूर्या व त्याची पत्नी तुळजा यांच्यामधील केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, तुळजाने डॅडींना चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळत आहे.

तुळजाचे डॅडींना चॅलेंज

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सूर्या तुरुंगात आहे. पोलिस सूर्याला मारत असून, तिथे तुळजादेखील आहे. सूर्याला मारत असलेले पाहून तुळजा रडत असल्याचे दिसत आहे. ती रडत रडत म्हणते, “प्लीज, सूर्याला मारू नका. हे सगळं त्या डॅडींनी केलं आहे”, तितक्यात तुळजाचे वडील डॅडी तिथे येतात. ते म्हणतात, “घ्या. इथं आम्ही आमच्या जावईबापूंना सोडवायला आलोय आणि आमचीच पोरगी आमच्यावर आरोप करतेय.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सूर्या तुळजाला म्हणतो, “तू आज डॅडींवर घाणेरडे आरोप करून लय मोठं पाप केलंस”, असे म्हणून सूर्या तिथून निघून जातो. सूर्या तिथून गेल्यानंतर डॅडी तुळजाला हसत म्हणतात, “सांगणार नाहीस का तुझ्या नवऱ्याला हे सगळं आम्ही केलं. आधी तुझं मंगळसूत्र सांभाळ. ज्या सूर्यानं तुला मांडवातून पळवून नेली ना, तोच सूर्या तुला आमच्या दारात आणून टाकेल”, असे म्हणून डॅडी कुत्सितपणे हसताना दिसत आहेत. डॅडींचे हे बोलणे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते, “नाही एक दिवस सूर्याच्या हातातील बेड्या तुमच्या हातात घातल्या आणि या गावासमोर धिंड काढली नाही, तर नाव लावणार नाही, तुळजा सूर्यकांत जगताप.”, असे म्हणत तुळजाने स्वत:च्या वडिलांना डॅडींना चॅलेंज दिले आहे.

varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर आणण्याचा तुळजाने उचलला विडा…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी तुळजाचे कौतुक करीत तिला सूर्याबरोबरचे नाते वाचवण्याचा सल्ला दिला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स केल्याचे दिसत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “ही मालिका नव्या वेळेतसुद्धा गाजणार”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “बाप-लेक समोरासमोर येणार. आता मालिका खूपच इंटरेस्टिंग होणार”, तर एका नेटकऱ्याने कमेंट करीत म्हटले, “सूर्या-तुळजा काहीही करून तुमचं नातं वाचवा. कारण- ते डॅडी आहेत. सत्तेसाठी काहीही करतील.”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सूर्या डॅडींचा खूप आदर करतो. तो त्यांच्या शब्दासाठी काहीही करू शकतो. डॅडी त्याच्यासमोर चांगले असण्याचे-वागण्याचे नाटक करतात. त्याला वेळोवेळी मदत केल्याचा देखावा करतात; पण प्रत्यक्षात ते सूर्याचा वापर करून घेतात. ही गोष्ट त्यांची लेक तुळजाला माहीत आहे. त्यामुळे डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर आणण्याचा तिने निर्धार केला आहे.

हेही वाचा: ‘वनवास’ची निराशाजनक सुरुवात, नाना पाटेकरांच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख

आता तुळजा सूर्याला तिचे म्हणणे पटवून देणार की डॅडी त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader