वडील व मुलीचे नाते हे सर्वांच्याच जवळचे असते. काही ठिकाणी मात्र या नात्यामध्ये दुरावा आलेला दिसतो. वडील व मुलगी एकमेकांविरूद्ध उभे ठाकलेले दिसतात. ‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेतील तुळजा व तिच्या वडिलांचे म्हणजेच डॅडींचे नाते असेच काहीसे आहे. त्यांच्यात सतत वाद होताना दिसतात. डॅडी हे अतिशय धुर्त असून लोकांसमोर चांगले वागून त्यांना फसवताना दिसतात. त्यांच्या चांगल्या वागण्याला अनेकजण फसतात. मात्र, त्यांचे खरे रूप त्यांच्या घरातील लोकांना माहित आहे.

डॅडींच्या अशा वागण्याचा सूर्यादेखील शिकार झाला आहे. डॅडी म्हणजे त्याला देव वाटतात. ते म्हणतील ती पूर्व दिशा असे त्याला वाटते. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध तो कोणाचाही एक शब्द ऐकून घेत नाही. तुळजाने डॅडीविरूद्ध काही गोष्टी बोलल्यामुळे सूर्या व तुळजा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. याबरोबरच, तुळजाचा भाऊ शत्रू याचेही वागणे तिला पटत नाही. आता या सगळ्यात तुळजाला शत्रूविरूद्ध ठोस पुरावा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

rupali bhosale buys new mercedes car
मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Punha Kartvya Aahe
Video: वंदना गुप्तेंचा रूद्रावतार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील पहिली झलक आली समोर, पाहा प्रोमो
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
tharla tar mag taking leap or not netizens asked jui gadkari
‘ठरलं तर मग’ मालिकेत लीप येणार का? जुई गडकरीचं सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण; म्हणाली, “कृपया…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral

सूर्याच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांना….

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, भाग्यश्री तिच्या मैत्रीणीला विचारते सगळे माझ्याशी असं का वागत आहेत? तेव्हा तिची मैत्रीण संपूर्ण प्रसंग सांगते. ते ऐकल्यानंतर भाग्यश्रीला धक्का बसतो व ती खाली बसते. त्यानंतर त्या शिक्षकांकडे जातात. तिथे त्या मुलालादेखील बोलावल्याचे दिसत आहे. ते शिक्षक त्या मुलाला म्हणतात, तो फोन इकडे आण. तो मुलगा त्यांना उद्धटपणे बोलतो. म्हणतो, मी देणार नाही. मी कोणाला घाबरत नाही. हिच्या भावाला तर नाहीच नाही. पुढे पाहायला मिळते की भाग्यश्री तिच्या मैत्रीणीला रडत रडत म्हणते की, तो त्या व्हिडीओबरोबर काहीही करू शकतो. तिची मैत्रीण म्हणते, अगं तू दादाला सांग ना सगळं.

प्रोमो पुढे पाहायला मिळते की सूर्या तेजश्रीकडे गेला आहे. तो तिच्या खरवस घेऊन गेला आहे. तो देताना त्याला तिच्या हातावरील जखमा दिसतात. तो त्याबद्दल तेजश्रीला विचारतो. याच प्रोमोमध्ये पुढे दिसते की तुळजाच्या हातात शाळेतील सीसीटीव्ही फुटेज आले आहे. त्यामध्ये शत्रू शाळेतील मध्यान्ह भोजनात कसलेतरी औषध टाकताना दिसत आहे. ते पाहिल्यानंतर तुळजाचा संताप अनावर झाल्याचे दिसत आहे. ती म्हणते, “सूर्याच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांना मी कधीच माफ करणार नाही. मग तो माझा भाऊ का असेना? यावेळी तुम्ही सूर्याच्या साधेपणाचा फायदा उचलूच शकणार नाही. कारण-माझ्याकडे त्याला दाखवायला ठोस पुरावा आहे.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सूर्याला शत्रूचं सत्य दाखवू शकेल का तुळजा ?”, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: Video: वंदना गुप्तेंचा रूद्रावतार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील पहिली झलक आली समोर, पाहा प्रोमो

आता भाग्यश्रीला त्रास देणाऱ्या मुलाने तिचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याची गोष्ट सूर्याला समजणार का? शत्रू तेजश्रीला त्रास देत असल्याचे सत्य सूर्यासमोर येणार का? याबरोबरच शाळेतील अन्न खाऊन मुले आजारी पडली होती,त्याला सूर्या नाही तर शत्रू जबाबादार आहे, हे सत्य तुळजा सर्वांसमोर आणू शकणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader