‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं आहे. अभिनेता नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. सूर्या, तुळजा व्यतिरिक्त जालिंदर, शत्रुघ्न, तेजश्री, धनश्री, राजश्री, भाग्यश्री, सत्यजीत, पिंट्या या भूमिका आता घराघरात पोहोचल्या आहेत. सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकार खूप चर्चेत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी सेटवरील मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच तेजश्री म्हणजेच अभिनेत्री कोमल मोरेने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. “अमर्यादित मजा”, असं कॅप्शन तिने या डान्स व्हिडीओला दिलं आहे.

या व्हिडीओमध्ये, कोमल मोरे, अतुल कुडले आणि कल्याणी चौधरी यांचा डान्स पाहायला मिळत आहे. तिघांनी दादा कोंडके यांच्या ‘मला घेऊ चला’ चित्रपटातील ‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वाणीचा मसाला’ या गाण्यावर डान्स केला आहे. तिघं या गाण्यावर जबरदस्त थिरकताना पाहायला मिळत आहेत.

या डान्स व्हिडीओवर बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने अतुल कुडलेच्या मालिकेतील अभिनयाचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, “दादा कडक…तुम्ही मराठी सिनेसृष्टीतील आताचे निळू फुले आहात. खरंच तुमच्या अभिनयाला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “कोमल तू चक्क डान्स करते आहेस?” तसंच “कडक”, “खूप भारी”, “एक नंबर…मस्त वाटतंय”, “सगळे खूप छान नाचत आहात”, “सुपर कडक”, “एकच नंबर दादा”, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्याची आई पुष्पाची एन्ट्री झाली आहे. या पुष्पा काकूला जालिंदरने सूर्याच्या घरातून कागदपत्र चोरण्याचं काम दिलं आहे. पण, खरंतर पुष्पा काकू जालिंदरला मदत करण्यासाठी नाहीतर सूर्याला न्याय मिळवून देण्यासाठी आली आहे. पुष्पा काकूचा हा हेतू जालिंदरला कळल्यानंतर मालिकेत पुढे काय घडतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek amcha dada fame komal more atul kudale kalyani choudhary dance on dada kondke song pps