Lakhat Ek Amcha Dada Serial : अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेता दिशा परदेशी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका ८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतील चार बहिणी आणि एक भावाची कथा प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली आहे. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतेच या मालिकेचे १०० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर कलाकारांनी जल्लोष केला. या जल्लोषातील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांनी सेटवर केक कापून जल्लोष केला. यावेळी सेटवर सर्व कलाकार डान्स करताना पाहायला मिळाले. याचे व्हिडीओ सखा मामा म्हणजे अभिनेते वासू पाटील यांनी शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये कोणी मालिकेतील गाणी गाताना दिसत आहेत, तर कोणी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा – “प्रिय आशुआई…”, अश्विनी एकबोटेंच्या पुण्यतिथी निमित्ताने सूनबाईची भावुक पोस्ट, म्हणाली, “आजचा दिवस…”

हेही वाचा – Video: “बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता, पाहा व्हिडीओ

एका व्हिडीओमध्ये सूर्यादादा म्हणजे नितीश चव्हाण भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. ‘काळूबाईचं वारं माझ्या भरलं अंगात’ गाण्यावर नितीशसह इतर कलाकार थिरकताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMCची तात्काळ कारवाई, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने मानले आभार, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत बहिणींच्या हट्टापायी सूर्यादादा लवकरच तुळजाला प्रपोज करताना दिसणार आहे. हे प्रपोज पाहून तुळजाला जाणीव होते की सूर्या खरंच आपल्या प्रेमात पडला आहे. त्यामुळे तुळजा घाबरते. पण सूर्या म्हणतो, “मी तुझी गंमत करत होतो. मला माझ्या लहानपणीची तुळजा परत पाहिजे होती. म्हणून मी हे सगळं करत होतो.” सूर्याने तुळजाला प्रपोज केलेला प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek amcha dada fame nitish chavan dance in 100 episode completed celebration pps