दहीहंडीचा उत्सव म्हटलं की सगळ्यांच्या तोंडावर एक गाणं कायम असतं ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं ‘गोविंदा रे गोपाळा’. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हमाल दे धमाल’ चित्रपटातील हे गाणं वाजल्याशिवाय दहीहंडी उत्सवाला रंगच येत नाही, असं म्हणायला काही वावग ठरणार नाही. त्यामुळे मराठी कलाकार मंडळी सध्या दहीहंडी उत्सवानिमित्ताने ‘गोविंदा रे गोपाळा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांनी देखील ‘गोविंदा रे गोपाळा’वर भन्नाट डान्स केला आहे; त्यांचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेता नितीश चव्हाणची मध्यवर्ती भूमिका असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका जुलै महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत नितीशने सूर्यादादाची भूमिका साकारली असून त्याची आणि त्याचा चार बहिणींची कथा पाहायला मिळत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. सध्या मालिकेत कबड्डीचा सामना रंगला आहे. या सामन्यात गुळूंब क्रिडा मंडळ बाजी मारणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच गुळूंब क्रिडा मंडळातील स्पर्धक भन्नाट डान्स करताना पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “मी खूप कृतज्ञ आहे…”, नव्या मालिकेविषयी सांगताना मृणाल दुसानिसचं वक्तव्य, म्हणाली, “मालिकेचं नाव…”

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील काजू म्हणजेच अभिनेता महेश जाधवने गुळूंब मित्र मंडळाचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. “लाखात एक आमचा दादा मित्र मंडळ गुळूंब…किती थर लागतील कमेंट करून सांगा?”, असं कॅप्शन लिहित महेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘गोविंदा रे गोपाळा’ गाण्यावर सर्वजण डान्स करताना दिसत आहेत.

या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “लाखा एक आमचा अज्या”, “एक नंबर”, “विषय संपला आता”, “मस्त झालं…लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण झाली”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: “कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी…”, ऐश्वर्या नारकरांनी सुंदर नृत्य सादरीकरणातून दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

दरम्यान, याआधी सूर्यादादाचा राजश्री आणि भाग्यश्रीबरोबरचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. ‘ओ पिलगा व्यंकटी’ या तेलुगू लोकगीतावर तिघांनी जबरदस्त डान्स केला होता.