Lakhat Ek Amcha Dada Serial : ‘लागिरं झालं जी’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता नितीश चव्हाणच्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला सध्या प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेने सुरू होताच महिन्याभरात मराठी मालिकाविश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितीशने सूर्यादादाची भूमिका साकारली असून त्याची आणि त्याचा चार बहिणींची कथा पाहायला मिळत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. दुसऱ्या बाजूला मालिकेतील कलाकारांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहेत. नुकताच नितीशने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतो. सध्या ‘ओ पिलगा व्यंकटी’ नावाच तेलुगू लोकगीत खूप ट्रेंड होत आहे. या गाण्यातील हूकस्टेपने सगळ्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. याच ट्रेंड होत असलेल्या तेलुगू लोकगीतावर नितीशने मालिकेत बहिणींबरोबर जबरदस्त डान्स केला आहे.
हेही वाचा – Video: ‘पारू’ मालिकेत नात्यांचा नवा अध्याय सुरू होणार, प्रितमची प्रेयसी प्रियाचं सत्य समोर येणार
“जगताप डान्स कंपनीचे सीईओ”, असं कॅप्शन देत नितीशने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यादादा म्हणजेच नितीश राजश्री (ईशा) आणि भाग्यश्री (जुई तनपुरे) यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. तिघांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
नेटकरी काय म्हणाले?
सूर्यादादा, राजश्री व भाग्यश्रीच्या या डान्स व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी तिघांच्या डान्सचं कौतुक केलं तर कोणी सूर्यादादाच्या डान्सचं कौतुक केलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी शितल म्हणजेच शिवानी बावकरला मीस करत असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) मालिकेतील सूर्यादादाच्या चार बहिणींची नावं तेजश्री, राजश्री, भाग्यश्री आणि धनश्री अशी आहेत. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी बहिणींच्या भूमिकेत झळकल्या आहेत. मालिकेतील सूर्यादादा व त्याच्या बहिणींमधील गोड नातं प्रेक्षकांना चांगलं भावलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.