‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. सध्या मालिकेत प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. कारण अखेर तुळजाने सूर्यादादासमोर प्रेमाची कबुली दिली आहे. तिने खास सप्राइज देऊन सूर्यादादाला प्रपोज केलं. यामुळे सूर्याला धक्काच बसला. पण, तुळजाने तिच्या मनातील सूर्याबद्दलची भावना व्यक्त केली. त्यामुळे आता सूर्या आणि तुळजाच्या प्रेमाच्या गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता नितीश चव्हाण ( Nitish Chavan ) आणि अभिनेत्री दिशा परदेशीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिकेत नितीशने सूर्यकांत जगताप ( सूर्यादादा ) आणि दिशाने तुळजाची भूमिका निभावली आहे. दोघांचं पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. तसंच इतर पात्र देखील घराघरात पोहोचली आहेत. अशातच दुसऱ्या बाजूला सूर्यादादाने जीवलग मित्र काजू आणि पुड्याबरोबर जबरदस्त डान्स केला आहे. या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Video: शुभमंगल सावधान! भगरे गुरुजींच्या मुलाचं थाटामाटात पार पडलं लग्न, पारंपरिक पद्धतीने झाला गृहप्रवेश, पाहा व्हिडीओ

अभिनेता नितीश चव्हाणने हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये नितीश अभिनेता महेश जाधव ( काजू ) आणि स्वप्नील कनसे ( पुड्या ) यांच्याबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिघांनी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतं असलेलं गाणं ‘प्रेमिका ने प्यार से’वर डान्स केला आहे.

हेही वाचा – Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”

नितीश चव्हाण, महेश आणि स्वप्नीलच्या या डान्स व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “वाव”, “कडक”, “मस्त डान्स”, “खूप छान”, “भारी”, “या ट्रेंडचे विजेता तुम्ही आहात”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with mahesh jadhav and swapnil kinase pps