‘झी मराठी’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण, दिशा परदेशी, गिरीश ओक, अतुल कुडले, सुमेधा दातार, कल्याणी चौधरी असे अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. याच मालिकेतील एका अभिनेत्याने आईच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केलं आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सत्यजीत सरनोबतच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता स्वप्निल पवारच्या आईवर गेले तीन महिने उपचार सुरू आहेत. त्यांना ब्रेन स्ट्रोक आजार झाला आहे. पुण्यातील रुग्णालयात स्वप्निलच्या आईवर उपचार सुरू असून लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत मदतीसाठी आवाहन केलं आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Hansika Motwani sister in law Muskan Nancy James files police complaint
हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात अभिनेत्री वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न

हेही वाचा – “बाबा, तुम्हाला जाऊन २० वर्ष उलटून गेली पण…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्ताने लेकीची भावुक पोस्ट; म्हणाली, “तुमचा आत्मा मला…”

स्वप्निल पवारची पोस्ट

“मी स्वप्निल संजय पवार, खरंतर हा मॅसेज लिहिण्याची वेळ कधी येईल असं स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण प्रश्न माझ्या आईच्या उपचारांचा आहे, म्हणून मी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतोय. माझी आई सौ. उज्वला संजय पवार ही गेले तीन महिने हॅास्पिटलमध्ये दाखल आहे. तिच्यावर ब्रेन स्ट्रोक या आजारावर उपचार सुरू आहेत. सध्या ती दिनानाथ मंगेशकर हॅास्पिटल, पुणे येथे उपचार घेत असून या तीन महिन्यांमध्ये तिच्यावर वेगवेगळ्या अशा १० शस्त्रक्रिया झाल्या आहेत; ज्याचा खर्च जवळपास २९ लाख रुपये झाला आहे.”

शस्त्रक्रियांची नावे –
DSA – Digital Subtraction Angiography
EVD – External Ventricular Drainage
Omaya Reservior
VP shunt
VP shunt Revised
Tracheostomy
Programmable shunt
DSA revised
Embolization
Aneurysm clipping

आईचा कुठलाच हेल्थ इन्शूरन्स नसल्यामुळे सगळा खर्च आम्ही केला असल्याने आमच्या जवळच्या सगळ्या बचती आता संपत आलेल्या आहेत. माझी आपणाला विनंती आहे की, आपली छोटीशी मदत माझ्या आईचा उपचार पूर्ण करू शकते. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितकी मदत तुम्ही करावी ही आशा करतो.

बँक खात्याची माहिती:-
बँकचे नाव:- स्टेट बँक ऑफ इंडिया
खाते क्रमांक:- ३१६१२७६३५६०
आयएफएससी कोड:- SBIN0000473
फोन/जी-पे नंबर:- ८८८८८२६८९९ / ९७६२४११६७३

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकारांची ग्रेट भेट; निमित्त आहे खूपच खास

या पोस्टनंतर स्वप्निल पवारने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो आभार मानत म्हणाला, “काल मी एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये मी आईच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन केलं होतं. खूप कमी वेळात माझ्या खात्याला मोठी रक्कम जमा झाली, त्यावर माझा विश्वास बसत नाही. इतकी मोठी रक्कम जमा झालीये की, माझं गूगल पे लिमिट फुल्ल झालं. त्यामुळे इतरांना माझ्या बँक खात्याची माहिती द्या. जेणेकरून मला मदत मिळणं सोप होईल. कारण खूप लोकं माझ्यापर्यंत पोहोचतायत आणि सांगतायत, लिमिट फुल्ल झाल्यामुळे पैसे पाठवणं शक्य होतं नाहीये आणि मदत करू शकत नाहीये. म्हणून मला प्रत्येकाला बँक खात्याचा मेसेज करावा लागतोय. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या आईसाठी प्रार्थना करताय. तुमचं मनापासून आभार. खरंतर आभार हा शब्द खूप कमी आहे.”

हेही वाचा – “…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं…”

दरम्यान, स्वप्निल पवारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेपूर्वी ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’, ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तो बऱ्याच अल्बम साँगमध्ये झळकला आहे.

Story img Loader